मुंबई इंडियन्सच्या 'या' अष्टपैलू खेळाडूवर बलात्काराचा गुन्हा! तरुणीसोबत शारीरिक संबंध केल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

IPL player Shivalik Sharma News :  इंडियन प्रीमियर लीगचा क्रिकेटर शिवालिक शर्माविरोधात जोधपूरच्या कुडी भगतासनी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ADVERTISEMENT

IPL Player Shivalik Sharma
IPL Player Shivalik Sharma
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आयपीएल क्रिकेटरवर तरुणीने केले गंभीर आरोप

point

मैत्रिपासून साखरपुड्यापर्यंत पोहोचलं प्रकरण

point

तरुणीसोबत नेमकं घडलं तरी काय?

IPL player Shivalik Sharma News :  इंडियन प्रीमियर लीगचा क्रिकेटर शिवालिक शर्माविरोधात जोधपूरच्या कुडी भगतासनी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडितेची मेडिकल टेस्ट झाली असून कोर्टात जबाबही नोंदवण्यात आलाय. पोलीस क्रिकेटरचा शोध घेत असून आरोपीला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. 

शिवालिक शर्माविरोधात गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. पीडित तरुणीसोबत साखरपूडा करून लग्नाचं आमिष दाखवत तिच्यासोबत शारिरीक संबंध केले, असा आरोप आहे. एसीपी आनंदसिंग राजपुरोहित यांनी म्हटलंय की, कुडी भगतासनीच्या सेक्टर दोनमध्ये राहणाऱ्या तरुणीने आयपीएल क्रिकेटर शिवालिक शर्माविरोधात तक्रार दाखल केली होती. तरुणी फेब्रुवारी 2023 मध्ये बडोद्यात फिरायला गेली होती. तेव्हा तिची ओळख शिवालिकशी झाली आणि दोघांमध्ये मैत्री झाली.

हे ही वाचा >> Maharashtra Board HSC Result 2025: 12 वीच्या निकालाची तारीख लवकरच, रोल नंबर 'असा' करा डाऊनलोड

मैत्रिपासून साखरपुड्यापर्यंत पोहोचलं प्रकरण

शिवालिक आणि त्या तरुणीमध्ये मैत्री झाली. त्यानंतर हे दोघेही एकमेकांशी फोनवरून संवाद साधू लागले आणि त्यांच्यातील जवळीकपणा वाढू लागला. शिवालिकचे आई-वडिल ऑगस्ट 2023 मध्ये जोधपूरला आले होते. त्यानंतर कुटुंबियांच्या सहमतीने दोघांचा साखरपूडा पार पडला. शिवालिक पुन्हा जोधपूरला आला तेव्हा त्यांच्यात शारिरीक संबंध झाले.राजस्थानमध्ये अनेठ ठिकाणी दोघे फिरायला गेले. ऑगस्ट 2024 मध्ये पीडितेला गुजरातला बोलावलं.

तेव्हा शिवालिकच्या आई-वडिलांनी म्हटलं की तो क्रिकेटर आहे. लग्नसोहळा पुढे होणार नाही.त्याला दुसऱ्या ठिकाणाहून मागणी येत आहेत.त्यानंतर याप्रकरणी तक्रार दाखल झाली. कुडी भगतासनी पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणाशी संबंधीत साक्षीदारांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. शिवालिक शर्मा गुजरात येथील बडोद्याचा रहिवासी आहे. 2024  मध्ये तो मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सामील होता. तसच शिवालिक रणजी ट्रॉफित बडोद्यासाठी खेळला आहे.

हे ही वाचा >> खात्यात अचानक येऊ लागले पैसे... थेट 71 हजार 500 रुपयांचा फायदा, तुम्ही अकाउंट तपासा!

हे वाचलं का?

    follow whatsapp