वडिलांनी विकलेल्या जमिनीचं पोरानं आज सोनं केलं, 35 चेंडूत शतक ठोकणारा 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?

मुंबई तक

Vaibhav Suryavanshi:राजस्थान रॉयल्सचा अवघ्या 14 वर्षांचा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी यांनी केवळ 35 चेंडूत शतक ठोकत एक नवा विक्रम रचला आहे. जाणून घ्या वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

जयपूर: भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर एक नवा तारा उदयास आला आहे, आणि त्याचे नाव आहे वैभव सूर्यवंशी. वय फक्त 14 वर्षे, पण क्रिकेटच्या मैदानावर त्याने सोमवारी (28 एप्रिल) अशी काही जादू दाखवली की, क्रिकेट विश्वात त्याच्याच नावाची चर्चा आहे. आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभवने अवघ्या 35 चेंडूत शतक ठोकून इतिहास रचला आहे. IPL मधील सर्वात कमी वयात शतक ठोकणारा क्रिकेटर बनलाय. हा तरुण खेळाडू कोण आहे, आणि त्याने एवढ्या कमी वयात ही ऐतिहासिक कामगिरी कशी साध्य केली? याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

35 चेंडूत शतक, IPL मधील ऐतिहासिक कामगिरी

28 एप्रिल 2025 रोजी राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने क्रिकेट विश्वाला थक्क करणारी कामगिरी केली आहे. अवघ्या 35 चेंडूत 100 धावा ठोकत त्याने आयपीएलमधील सर्वात कमी वयातील शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला. या खेळीत त्याने तब्ब 11 षटकार आणि 7 चौकार लगावले. त्याच्या आक्रमक फलंदाजीने गुजरात टायटन्सच्या दिग्गज गोलंदाजांचा आत्मविश्वासही ढासळला. 

राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत X हँडलवर या कामगिरीची प्रशंसा करताना म्हटलं, "VAIBHAV SOORYAVANSHI, REMEMBER THE NAME 🔥🔥🔥" आणि खुद्द राहुल द्रविडसुद्धा त्याच्या खेळीने प्रभावित होऊन उभे राहून टाळ्या वाजवत होते.

कोण आहे वैभव सूर्यवंशी?

बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्यातील ताजपुर गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वैभवने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी त्याच्या क्रिकेटच्या स्वप्नांना पंख दिले. कुटुंबाने आर्थिक अडचणींना तोंड देताना जमीन विकण्यापर्यंत मजल मारली, पण वैभवच्या प्रतिभेला खुलवण्यासाठी त्यांनी कधीच माघार घेतली नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp