Pehalgam मधील हल्ल्यानंतर BCCI चे ICC ला पत्र, पाकिस्तानसोबतच्या सामन्याबद्दल काय म्हटलंय?
Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलेच वाढले आहेत. त्यानंतर आता याचा परिणाम क्रिकेटवरही होताना दिसतोय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पहलगाममधील घटनेनंतर BCCI आक्रमक

तणाव वाढल्यानंतर BCCI चे ICC ला पत्र

BCCI ने पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय?
India Pakistan cricket Tension : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सुद्धा अॅक्शन मोडमध्ये आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) ला पत्र लिहिलं असल्याचं सांगितलं जातंय.
समोर आलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने म्हटलं आहे की, आम्ही पाकिस्तानसोबत सामना खेळू इच्छित नाही. भारत आणि पाकिस्तान शेवटचा सामना 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झाला होता. तेव्हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने पाकिस्तानला सहा गडी राखून पराभूत केलं होतं.
हे ही वाचा >> पाकिस्तानने ताश्कंद करार रद्द केला तर काय होईल? करारामध्ये कोणत्या मुद्द्यांचा उल्लेख?
"दोन्ही संघांना एका गटात ठेवू नका"
क्रिकबझच्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ICC ला पत्र लिहिलंय. BCCI ने विनंती केली की, भविष्यातील आयसीसी जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवू नये. म्हणजेच आता बीसीसीआयला आता किमान आयसीसी स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना नको आहे.
तरीही, दोन्ही संघ आयसीसी महिला वनडे विश्वचषकात सहभागी होतील. पाकिस्तानने आठ संघांच्या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघ राउंड-रॉबिन स्वरूपात इतर सर्व संघांविरुद्ध खेळेल.