पाकिस्तानने ताश्कंद करार रद्द केला तर काय होईल? करारामध्ये कोणत्या मुद्द्यांचा उल्लेख?
Tashkent Agreement: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने कठोर पावलं उचलली. ज्यामध्ये सिंधू जल करार रद्द करणे आणि तीन पाकिस्तानी लष्करी राजदूतांना देश सोडण्याचे आदेश देणे हे निर्णय समाविष्ट आहेत. त्याविरोधात आता पाकिस्ताननेही आक्रमक भूमिका घेतली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पाकिस्तान ताश्कंद करारही रद्द करणार?

भारतावर काय परिणाम होणार?

ताश्कंद करारातील महत्वाचे मुद्दे कोणते?
Tashkent Agreement : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाद पुन्हा पेटलाय. गोळीबारात 27 निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. त्यानंतर भारताने पाच महत्वाचे निर्णय घेत पाकिस्तानला इशारा दिला. यामध्ये सिंधू जल कराराचा उल्लेख वारंवार होतोय. मात्र, आता पाकिस्ताननेही शिमला करार आणि ताश्कंद करार रद्द करण्याचं हत्यार उपसलं आहे. या माध्यमातून पाकिस्तानचं भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहे.
हे ही वाचा >> पाकिस्तान भारताला ज्याची धमकी देतोय, तो शिमला करार नेमका काय?
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने कठोर पावलं उचलली. ज्यामध्ये सिंधू जल करार रद्द करणे आणि तीन पाकिस्तानी लष्करी राजदूतांना देश सोडण्याचे आदेश देणे हे निर्णय समाविष्ट आहेत. प्रत्युत्तरादाखल, पाकिस्तानने 1972 चा शिमला करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अशी माहिती समोर आली आहे की, 1966 चा ताश्कंद करार देखील रद्द करू शकतो. जर पाकिस्तानने ताश्कंद करार स्थगित केला तर त्याचा भारताला फायदा होईल की नुकसान? चला सविस्तर समजून घेऊया.
ताश्कंद करार काय आहे?
ताश्कंद करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांतता करार होता. 10 जानेवारी 1966 रोजी उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे स्वाक्षरी करण्यात आला. या करारामुळे 1965 चे भारत-पाकिस्तान युद्ध संपले. सोव्हिएत युनियनचे पंतप्रधान अलेक्सी कोसिगिन यांनी यावेळी मध्यस्थी केली होती. या करारावर भारताच्या वतीने पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानच्या वतीने राष्ट्रपती अयुब खान यांनी स्वाक्षरी केली होती.
ताश्कंद करारामध्ये कोणते मुद्दे?
भारताचे पंतप्रधान आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती यांनी सहमती दर्शवली की दोन्ही बाजूंनी संबंध राखण्यासाठी प्रयत्न होतील. संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार शांततापूर्ण मार्गाने वाद सोडवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची काळजी घेतील. भारत-पाकिस्तान देशांमधील अशांतता दोन्ही देशातील लोकांच्या हिताची नाही यावरही त्यांनी सहमती दर्शवली. यावेळी जम्मू आणि काश्मीरवर चर्चा झाली ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या.