Emergency Aleart चा ‘तो’ मेसेज अन् नागरिक हादरले, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Many people received an Emergency Alert message on their mobiles today (July 20) in the morning. This created a lot of confusion among the citizens. But let's know in detail what this message is.
Many people received an Emergency Alert message on their mobiles today (July 20) in the morning. This created a lot of confusion among the citizens. But let's know in detail what this message is.
social share
google news

Maharashtra News Marathi Live: गणेश जाधव, मुंबई: महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यात नागरिकांच्या मोबाइलवर (Mobile) आज (20 जुलै) सकाळच्या सुमारास अचानक Emergency Aleart असा मेसेज आला. ज्यामुळे अनेकांचे धाबे चांगलेच दणाणले. कारण असा मेसेज आल्यानंतर अचानक मोबाइल व्हायब्रेट होऊ लागले. त्यामुळे अनेकांचा प्रचंड गोंधळ उडाला. अचानक आलेल्या या मेसेजने नागरिकांमध्ये अद्यापही संभ्रम आहे. मराठी व इंग्लिश या दोन्ही भाषेत हे मेसेज 10 मिनिटांच्या अंतराने आले. अशा प्रकारचा मेसेज नेमका का आला यासाठी एकमेकांशी फोनाफोनी देखील सुरु झाली. काही जणांना हा सायबर अटॅक (Cyber Attack) वाटला. मात्र तसे काही नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. (received an emergency alert message on mobiles created a lot of confusion know in detail what this message is maharashtra news today in marathi)

ADVERTISEMENT

तो मेसेज अन् नागरिकांमध्ये घबराट, पण…

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक चाचणीचा इशारा अशा स्वरूपाचा हा मेसेज असून पुन्हा Emergency अलर्ट हवा आहे का? हा प्रश्न विचारत yes किंवा no असा पर्याय निवडा असे या मेसेज प्रक्रियेचे स्वरूप आहे.

हे ही वाचा >> IrshalWadi Landslide : ‘माझे तर सगळेच मेले’, वन विभागामुळे इर्शाळवाडी गेली मृत्यूच्या जबड्यात!

स्थानिक प्रशासनाला व आपत्ती जोखीम विभाग यांना या मेसेज व कारणाबाबत सुरुवातीला माहिती नव्हती. मात्र बीएसएनएल अधिकारी यांनी याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना कळविले असता भूकंप, पूर, हवामान, युद्धजन्य स्थिती, आणीबाणी यासाठी देशातील सर्व नागरिकांना एकाचवेळी अलर्ट करण्यासाठी नवीन प्रणाली आल्याचे कारण समोर आले आहे.

हे वाचलं का?

नैसर्गिक आपत्ती, मुसळधार पाऊस व इतर वेळी देखील नागरिकांना मेसेजद्वारे सावध करण्यासाठी केलेला हा चाचणी प्रयोग आहे. देशभर राबविल्या जाणाऱ्या या चाचणीचा गाजावाजा केंद्र व राज्य सरकारने केला नाही. त्यामुळे अनेकांमध्ये सुरुवातीला घबराट निर्माण झाली. मात्र, जेव्हा हा चाचणी मेसेज आहे असं समजलं तेव्हा अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> महाराष्ट्र शोकसागरात तर दुसरीकडे ‘राज’पुत्र अमित ठाकरेंच्या स्वागतासाठी डीजे, 350 किलोचा हार

ब्रिटनमध्ये अशी यंत्रणा वापरली जाते हे ही समोर आले आहे. ही अमेरिकेची कार्यप्रणाली असून भारतामध्ये ही फक्त चाचणी स्वरूपात तपासली जात आहे. यापुढेही आपल्याला अमेरिकन नागरिकांप्रमाणे नैसर्गिक आपत्तीचे नॅचरल डिझास्टर अलर्ट मिळणार आहेत. ज्यामुळे अनेकांचे जीव वाचवता येतील.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT