Samruddhi Accident : ‘4-5 प्रवाशी अंगावर पडले अन्…’, साईनाथने सांगितला घटनाक्रम

मुंबई तक

ADVERTISEMENT

samruddhi mahamarg accident news today marathi : who escaped from accident bus told the story
samruddhi mahamarg accident news today marathi : who escaped from accident bus told the story
social share
google news

– कुवरचंद मंडले, नांदेड

Samruddhi Mahamarg Accident Marathi : नागपुरहून बस निघाली पण पुण्यात पोहोचलीच नाही. पुण्यात पोहोचण्याआधीच बसचा कोळसा झाला आणि मृत्यूने गाढ झोपेत असलेल्या 25 जीवांचा घास घेतला. मृत्युचा जबडा वासलेला असतानाच 8 जणांनी त्या दाढेतून उडी घेतली आणि जीव वाचवले. त्यापैकीच एक आहे साईनाथ पवार! बसला लागलेली आग आणि होरपळून मेलेली माणसं साईनाथने डोळ्यांनी बघितली. हीच आपबिती त्याने सांगितलीये. (samruddhi mahamarg accident news)

शनिवारी (1 जुलै) विदर्भ ट्रॅव्हल्सची बस नागपुरहून पुण्याला निघाली होती. कारंजाजवळ एका ढाब्यावर प्रवाशांनी जेवणं केली आणि बस पुढच्या दिशेने रवाना झाली. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे दबा धरून बसलेल्या काळाने झडप घातली आणि 25 जीव होरपळून मेले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

साईनाथने कशी घेतली बाहेर उडी, काय घडलं?

अपघातावेळी नेमकं काय घडलं आणि काही प्रवाशी बसमधून कसे बाहेर पडले याबद्दल साईनाथ पवारने सांगितलं.

Samruddhi Mahamarg Accident : ‘ना टायर फुटला, ना स्पीड जास्त’, असा झाला बस अपघात

माहुर तालुक्यातील बोरवाडी येथील साईनाथ पवार (वय 19) छत्रपती संभाजीनगर येथील एका कंपनीत कामाला आहे. साईनाथ आणि त्याचा मित्र योगेश रामदास गवई (रा. मेहकर) हे दोघे कंपनीच्या कामानिमित्त गुरुवारी नागपुरला गेले होते. नंतर शुक्रवारी (30 जुलै) सायंकाळी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसने ते परत निघाले होते.

ADVERTISEMENT

विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा अपघात कसा झाला?

समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा अपघात झाला. अपघातानंतर वेळीच बाहेर पडलेल्या साईनाथने संपूर्ण हकिकत सांगितली.

ADVERTISEMENT

साईनाथ म्हणाला की, “मला 19 नंबरची आणि योगेशला 20 नंबरची वरची सीट मिळाली होती. ही ट्रॅव्हल्स कारंजाजवळ (जि.वाशिम) जेवणासाठी थांबली. आम्ही जेवण केले आणि वरच्या सीटवर जाऊन झोपी गेलो.ही बस पुढे समृद्धी महामार्गावर आली.”

वाचा >> ‘मी साधुसंत नाही, तर…’, उद्धव ठाकरे, अमृता फडणवीसांचा उल्लेख, देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?

“आम्हाला झोप लागली होती आणि काही वेळानंतर अचानक मोठा आवाज झाला. त्यानंतर मी व योगेश धाडकन खाली पडलो. त्यानंतर चार-पाच प्रवासी आमच्या अंगावर पडले. हे सर्व अचानक घडलं. त्यांना बाजूला करुन मी जवळचीच खिडकी फोडली आणि बाहेर पडलो. स्वतःचा जीव वाचविला. त्यानंतर आणखी दोघांना बसमधून बाहेर काढलं.”

“ती काच फुटलीच नाही”

“बसमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही बसच्या समोरच्या बाजूला गेला. चालकासमोरची काच आम्ही फोडण्याचा प्रयत्न केला. पण, ती फुटली नाही. आम्ही काच फोडण्याचा प्रयत्न करत असतानाच काही वेळात ट्रॅव्हल्सच्या डिझेल टॅकचा स्फोट झाला. त्यानंतर मागील बाजूने आगीचे मोठे लोळ उठले. त्यानंतर आमच्या डोळ्यादेखत अनेक प्रवाशांचा क्षणात कोळसा झाला”, असं साईनाथ पवारने सांगितलं आणि पोलिसांसह ऐकणारांच्या अंगावर शहारे आले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT