Dasara Melava 2023 : “काही जण खाल्ल्या ताटात थुंकणारे, खोक्यांपायी…” ठाकरेंचा टीझर रिलीज

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

shiv sena dasara melava 2023 teaser shivaji park dadar
shiv sena dasara melava 2023 teaser shivaji park dadar
social share
google news

Uddhav Thackeray Shiv Sena Dasara Melava 2023 : काही दिवसांवर दसरा आला आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. कारण गेल्यावर्षी प्रमाणेच दोन दसरा मेळावे मुंबईत होणार आहे. एक ठाकरेंच्या शिवसेनेचा. दुसरा शिंदेंच्या शिवसेनेचा. शिंदेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची जोरात तयारी सुरू असताना ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर समोर आलाय.

शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा दादरमधील शिवाजी पार्कवर होणार आहे. त्यामुळे ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेकडून वातावरण निर्मिती केली जात असून, दुसरा टीझर शेअर करण्यात आला आहे.

Shiv Sena Dasara Melava : दुसऱ्या टीझरमध्ये काय?

“मर्द विकला जात नाही, मर्द गद्दारी करत नाही! दसरा मेळावा २०२३”, असं म्हणत मेळाव्याचा टीझर शिवसेनेच्या (UBT) सोशल मीडिया हॅण्डल्सवर शेअर करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Shiv Sena च्या युती-आघाडीचा काय आहे इतिहास, कसं वापरलंय धक्कातंत्र?

“काही जण पळून जाणारे असतात. शेपूट घालून बसणार असतात. स्वार्थासाठी इमान विकणारे असतात. शत्रूशी हात मिळवणारे असतात. खाल्ल्या ताटात थुंकणारे असतात. खोक्यांपायी विकले जाणारे असतात. रात्रीच्या अंधारात गद्दारी करून घर फोडणारे असतात. पण मर्द विकला जात नाही. मर्द गद्दारी करत नाही. मर्दाचे एकच ठिकाण, शिवतीर्थ दादर! एक नेता, एक विचार, एक मैदान! दसरा मेळावा मर्दांचा मेळावा”, असं म्हणत या टीझरमधून अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार-खासदार आणि नेत्यांवर निशाणा साधण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

ठाकरेंच्या पहिल्या टीझरमध्ये काय?

“निष्ठावंत शिवसैनिकांचा… दसरा मेळावा!”, असं म्हणत ठाकरेंच्या सेनेकडून पहिला टीझर शेअर करण्यात आला. यात शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या गर्दीचे दृश्य आहेत. आणि म्हटलेलं आहे की, “तोच दिवस, तीच गर्दी, जल्लोष तोच… मैदान तेच… एकनिष्ठ शिवसैनिकांचा दसरा मेळावा. एकच पक्ष, एकच विचार, एकच मैदान!”

ADVERTISEMENT

समजून घ्या >> दसरा मेळावा अन् शिवसेना… शिवाजी पार्कवरुन काय झालेला राडा?

ठाकरेंच्या टीझरमधून शिंदेंवर बाण

यंदाच्या दसरा मेळाव्यात ठाकरे पुन्हा एकनाथ शिंदे आणि भाजपला लक्ष्य करणार, याचेच संकेत टीझरमधून मिळत आहे. आधी बंड आणि नंतर शिवसेना ताब्यात घेण्याबद्दलचा उल्लेख टीझरमध्ये आहेत. महत्त्वाचं म्हणजे गद्दार म्हणून पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या सेनेला डिवचण्यात आले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT