Atal Setu Toll Rate: सागरी सेतूवरुन जायचं असेल तर ‘एवढे’ पैसे द्यावेच लागतील, पाहा Toll Rate

रोहित गोळे

Mumbai Trans Harbour Link Atal Setu: मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (12 जानेवारी) देशातील सर्वात मोठा असलेल्या सागरी सेतूचं लोकार्पण करण्यात आलं. शिवडी-न्हावा शेवा अटल सागरी सेतूचं पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलं. तब्बल 21 किमी लांबीचा हा सागरी सेतू थेट रायगड जिल्ह्याला मुंबईशी जोडणार आहे. या सेतूमुळे 2 तासाचं अंतर हे अवघ्या 20 मिनिटात […]

ADVERTISEMENT

shivdi nhava sheva atal setu roll rate if you want to go to sea bridge inaugurated by pm modi you have to pay too much rupees see toll rate
shivdi nhava sheva atal setu roll rate if you want to go to sea bridge inaugurated by pm modi you have to pay too much rupees see toll rate
google news

Mumbai Trans Harbour Link Atal Setu: मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (12 जानेवारी) देशातील सर्वात मोठा असलेल्या सागरी सेतूचं लोकार्पण करण्यात आलं. शिवडी-न्हावा शेवा अटल सागरी सेतूचं पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलं. तब्बल 21 किमी लांबीचा हा सागरी सेतू थेट रायगड जिल्ह्याला मुंबईशी जोडणार आहे. या सेतूमुळे 2 तासाचं अंतर हे अवघ्या 20 मिनिटात कापता येणार आहे. त्यामुळे रायगड आणि नवी मुंबईकरांना मुंबई ही अधिकच जवळ आली आहे. पण याच सेतूवरून जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर त्याचा टोल देखील तेवढाच भरभक्कम भरावा लागणार आहे. (ashivdi nhava sheva atal setu roll rate if you want to go to sea bridge inaugurated by pm modi you have to pay too much rupees see toll rate)

शिवडी ते न्हावा शेवा हा सागरी सेतू उभारण्यासाठी तब्बल 21 हजार कोटींहून अधिकचा खर्च आला आहे. त्यामुळे आता हेच पैसे टोलच्या माध्यमातून सरकार वसूल करणार आहे. सुरुवातीला या मार्गासाठी 500 रुपये टोल आकारण्यात यावा अशी मागणी केली जात होती. मात्र, नंतर एकेरी वाहतुकीसाठी 250 रुपये टोल निश्चित करण्यात आला होता. पण हा टोल केवळ चार चाकी कारसाठीच होता. इतर वाहनांसाठी टोल हा वेगवेगळा असून आता त्याचं दर पत्रक देखील समोर आलं आहे.

या सागरी सेतूवरून कारने जर आपण दोन्ही बाजूने प्रवास करणार असाल तर आपल्याला त्यासाठी 375 रुपये टोल मोजावा लागणार आहे. पण एकाच बाजूने प्रवास करणार असाल तर मात्र 250 रुपये द्यावे लागतील. याशिवाय दैनंदिन पास 625 रुपये आणि मासिक पास (कारसाठी) 12,500 रुपये एवढा असणार आहे.

हे वाचलं का?