Solapur : चौघे पोहायला गेले, पण दोघेच पतरले, लग्नाला गेलेल्या तरुणांसोबत…
Solapur hipparga lake two friend drowned : सोलापूर जिल्ह्यात लग्नाला आलेले चार मित्र पोहण्यासाठी तलावात उतरले होते.मात्र या चार पैकी दोघांचा तलावात बुडुन मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
Solapur hipparga lake two friend drowned : सोलापूर जिल्ह्यात (Solapur) लग्नाला आलेले चार मित्र पोहण्यासाठी तलावात उतरले होते.मात्र या चार पैकी दोघांचा तलावात (lake Drowned) बुडुन मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. नागेश गणेश बोल्लू (वय 23), राज सुरेश गवळी (वय 21) अशी या मृत तरूणांची नावे आहेत. या तरूणांच्या मृत्यूची घरातल्या कुणालाच कल्पना नव्हती. ग्रामस्थांनी तलावात मृतदेह तरंगताना पाहिल्यावर ही घटना उघडकीस आली. (Solapur hipparga lake two friend drowned two alive shocking incident)
ADVERTISEMENT
महाराष्ट्रासह सोलापूर (Solapur) जिल्ह्यात उष्णता प्रचंड वाढली आहे. या वाढत्या उष्णतेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी अनेकजण वॉ़टरपार्क अथवा तलावात पोहत आहे.अशात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पोहायला गेलेल्या दोन तरूणांचा तलावात बूडून मृत्यू झाल्याची घटना घडली. नागेश गणेश बोल्लू (वय 23), राहणार सगन नगर, मुळेगाव रोड, विडी घरकुल आणि राज सुरेश गवळी (वय 21), सगम नगर मुळेगाव रोड, विडी घरकुल, अशी या मृत तरूणांची नावे आहेत. सोलापूर शहराजवळील तळे हिप्परगा येथील तलावात हे दोनही तरूण पोहोयला गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने बुडुन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घड़ली.
हे ही वाचा : वडिलांचे हात-पाय बांधले अन् नराधमाने आईवरच केला बलात्कार
लग्नसमारंभासाठी हे चौफे मित्र रविवारी 21 मे रोजी गेले होते.लग्न समारंभाचा कार्यक्रम आटोपून घरी येताना दुपारच्या सुमारास सोलापूर शहरालगत असलेल्या तळे हिप्परगा (hipparga lake) येथे चौघे मित्र पोहायला गेले होते.दोघा मित्रांना पोहायला येत असल्याने दोघांनी तलावात उड्या मारल्या होत्या. तर नागेश बोल्लू आणि राज गवळी या दोघांना पोहता येत नव्हते.तरीही देखील या दोघांनी तलावात उड्या घेतल्या होत्या. पोहताना दोघांना तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडुन दूदैवी मृत्यू झाला.
हे वाचलं का?
या घटनेनंतर पोहता येणारे दोन्ही मित्र घरी परतले होते.तर पोहता न येणाऱ्या दोघांचा थांगपता लागत नव्हता. त्यामुळे चौघांपैकी दोघेच मित्र परत आले आणि आलेल्या मित्रांनी देखील याबाबत माहिती दिली नाही. दरम्यान तलावाच्या परिसरात असलेल्या नागरिकांना सोमवारी दुपारी दोन तरुणांचे मृतदेह तरंगताना दिसले होते.या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती.पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठवले आहेत. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
हे ही वाचा : मोलकरीण.. हनीट्रॅप अन् डॉक्टर.. भयंकर घटनेचा कसा झाला पर्दाफाश?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT