टॅक्सी चालक 4 वर्षात कोट्यधीश! श्रीमंत होण्यासाठी सांगितली सोपी TRICK!
Viral Story: एक टॅक्सी ड्रायव्हर हा आता कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा व्यवसायिक म्हणून उदयाला आला आहे. जाणून घ्या त्यांच्या यशाची नेमकी कहाणी.
ADVERTISEMENT
Marathi News for Today: दुबई: एक व्यक्ती टॅक्सी ड्रायव्हर (Taxi Driver) म्हणून काम करत होता पण आता तो चक्क कोट्यधीश (millionaire) झाला आहे. आता त्याच्याकडे एवढे प्रचंड पैसे आहेत की, त्याने स्वतःची लिमोझिन कंपनी सुरू केली आहे. सलीम अहमद खान असे या व्यक्तीचे नाव आहे. जो मूळचा पाकिस्तानचा रहिवासी आहे. मात्र यावेळी तो यूएईमध्ये (UAE) स्थायिक असून त्याने पाहिलेलं स्वप्न पूर्ण करत आहे. 2009 मध्ये तो यूएईमध्ये टॅक्सी चालक म्हणून आला होता. पण आता तो प्रचंड श्रीमंत झाला आहे. एक टॅक्सी ड्रायव्हर ते कोट्यधीश असा हा त्याचा प्रवास फारच रंजक आहे. पण याचेवळी त्याने श्रीमंत होण्याची एक सोपी Trick देखील सांगितली आहे. (taxi driver millionaire businessman earns crores of rupees investment money car company)
ADVERTISEMENT
खलीजा टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सलीम खान हा 2013 पर्यंत टॅक्सी चालवत होता. त्याने उबरसाठी काम केले होते आणि 2019 पर्यंत उबरमध्येच काम करून त्याने पैशाची बरीच बचत केली. त्यानंतर त्याने 850 चालकांसह स्वत:ची फ्लीट कंपनी सुरू केली.
हे ही वाचा >> Mira Road Murder : लिव्ह इन पार्टनरचे लाकूड कापायच्या मशीनने केले तुकडे
आता त्याची फ्लीट कंपनीची सेवा संपूर्ण UAE मध्ये पुरवली जात आहे. कंपनीची सुरुवात ही त्याने 20 टॅक्सींनी केली होती. तो म्हणतो की, ‘मी 2013 च्या मध्यापर्यंत टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केले. यानंतर, लक्झरी लिमोझिन टॅक्सी सेवेत प्रवेश केला आणि 2019 पर्यंत ड्रायव्हर म्हणूनच काम केले.’
हे वाचलं का?
कोट्यवधीचा बिझनेस सांभाळतो सलीम
सलीम खान हा मूळचा लाहोरचा आहे. जो आज दुबईतील एक प्रचंड यशस्वी असा उद्योगपती बनला आहे. अवघ्या चार वर्षांत तो कोट्यधीश झाला आहे. 2009 साली जेव्हा तो UAE मध्ये आला तेव्हा टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत असताना त्याला महिन्याला 5,000 दिरहम (सुमारे 1,12,267 रुपये) मिळत असे. आज त्याचा स्वत:चा 5 लाख दिरहम (सुमारे 11 कोटी रुपये) चा व्यवसाय आहे. कोरोना महामारीच्या संकटाआधीचं वर्ष सलमीसाठी खूप महत्त्वाचं होतं. या काळात त्याने भरपूर यश मिळवलं. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
हे ही वाचा >> जयश्रीचा ‘लग्न घोटाळा’, 35 वर्षीय महिला करायची लग्न अन् 5 दिवसातच…
खान कधी 12 तास तर कधी त्याहूनही जास्त काम करायचा. 2013 मध्ये त्याने स्वतःची लिमोझिन खरेदी केली. तो जे काही पैसे कमवत असे, ते आपल्या व्यवसायात गुंतवत राहिला. त्यानंतर 2019 मध्ये त्याने ‘किंग रायडर्स डिलिव्हरी सर्व्हिसेस’ या नावाने एक कंपनी सुरू केली. आज घडीला त्याच्याकडे 850 कर्मचारी आहेत. यासोबतच तो आणखी एक लक्झरी ट्रान्सपोर्ट कंपनी देखील सुरू करत आहे. यासाठी त्याने 20 आलिशान वाहनांची ऑर्डर दिली आहे आणि आता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. 2023 च्या अखेरीस या आलिशानच्या गाड्यांचा ताफा 100 पर्यंत वाढवण्याची सलीमची योजना आहे.
ADVERTISEMENT
यावेळी सलीमने सांगितलं की, आपल्याला जो व्यवसाय करायचा आहे त्याबाबत 100 टक्के नियोजन करा. तुमच्या लक्ष्यापासून काहीही झालं तरू दूर जाऊ नका. पैशाचं नियोजन करा.. एवढ्या गोष्टी केल्यात तरी तुम्ही अगदी शाश्वतपणे श्रीमंत होऊ शकता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT