Viral Video: कारमध्ये पतीला दुसऱ्या बाईसोबत पाहिलं अन्… बायकोचं डोकंच फिरलं, राडा तर विचारूच नका!
राजस्थानमध्ये ठुकरानाचे मुख्याध्यापक आणि मुख्य गट शिक्षण अधिकारी (CBEO) यांना इंदिरा सर्कल येथे एका कारमध्ये आक्षेपार्ह स्थितीत पकडण्यात आले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कारमध्ये पत्नीने मुख्याध्यापक पतीला आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं

पत्नीने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Crime News: राजस्थानमधून एक चकित करणारं प्रकरण समोर आलं आहे. ठुकरानाचे मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागाचे सहाय्यक मुख्य गट शिक्षण अधिकारी (CBEO) यांना इंदिरा सर्कल येथे एका कारमध्ये आक्षेपार्ह स्थितीत पकडण्यात आले.
गाडी नव्हे तर हॉटेल रूम...
शनिवारी रात्री ही घटना घडल्याचं समोर आलं. श्रीगंगानगरच्या शिक्षण विभागाचे CBEO नरेश रिणवा आणि एका प्रसिद्ध शाळेचे मुख्याध्यापक सुट्टीच्या दिवशी काहीतरी वेगळं करण्याच्या मूडमध्ये होते. त्यावेळी त्यांच्या गाडीत त्यांच्यासोबत एक महिला होती आणि गाडीत पूर्ण सेटअप (आक्षेपार्ह वस्तू आणि बेकायदेशीर कृत्यांसाठी पूर्ण व्यवस्था) करण्यात आला होता.
पेशाने वकील असलेल्या मुख्याध्याकाच्या पत्नी त्या रात्री अचानक घटनास्थळी पोहोचल्या आणि या सगळ्या प्रकाराचा खुलासा करण्यात आला. त्यावेळीचं दृश्य एखाद्या थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नव्हतं. पत्नीने आपला पती आणि त्याच्यासोबत असलेल्या महिलेला गाडीत रंगेहाथ पकडलं आणि महिलेचे केस ओढून तिला गाडीतून बाहेर काढलं.
पत्नीला गाडीखाली आणण्याचा प्रयत्न
मुख्याध्यापकाच्या घाणेरड्या कृत्याचा खुलासा झाला असता तो घटनास्थळावरून पळून जाऊ लागला. इतकेच नव्हे तर त्यावेळी त्याने आपल्या पत्नीला गाडीने चिरडण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी प्रकरणातील आरोपींनी सुरतगडमध्ये एका व्यक्तीला त्यांच्या गाडीने चिरडलं होतं आणि इतर तीन लोकांनाही पायदळी तुडवलं असल्याचं सांगितलं जात आहे.
या प्रकरणात एक सरकारी अधिकारी, शाळेचा मुख्याध्यापक आणि एक संशयित महिलेचा सहभाग असल्याकारणाने या घटनेचा गांभीर्याने तपास केला जात आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तपास सुरू असून संबंधित घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा: छांगुर बाबाचा मोठा कारनामा! नीतूच्या मुलीचं आपल्या नातवासोबत लग्न; हुंड्यामध्ये 5 कोटीचं...
काय आहे नेमकं प्रकरण?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापकाची पत्नी रात्री तिच्या मुलासोबत स्कूटीवरून जात होती. त्यावेळी सरकारी शाळेचा मुख्याध्यापक असलेला आपला पती एका कारमधून जात असल्याचं महिलेने पाहिलं. त्यावेळी महिलेला संशय आला आणि ती आपल्या पतीचा पाठलाग करू लागली. गाडीत आक्षेपार्ह स्थितीत असलेल्या मुख्याध्यापकाने त्यावेळी आपल्या पत्नीला पाहिलं असता तो खूप घाबरला आणि आपल्या पत्नीवर गाडी चालवण्याचा प्रयत्न केला. मुख्याध्यापकाची गाडी स्कूटरला धडकताच तिचा टायर फुटला. दरम्यान पत्नी गाडीत शिरली आणि तिने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडले.
त्यावेळी CBEO असलेला पतीचा मित्र रमेश रिणवासुद्धा कारमध्ये असल्याचा आरोप महिलेने केला आहे. मात्र, रमेश रिणवालच्या मते, त्याने मित्राच्या गाडीत केवळ लिफ्ट मागितली होती.
हे ही वाचा: एक पती अन् दोन बायका! चोरीचा रचला कट... दोघींचे चक्रावून टाकणारे कारनामे
लोकांची प्रतिक्रिया
या प्रकरणाबद्दल लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. काहीजण प्रकरणाला "राजस्थानचा धाकड कांड" म्हणत आहेत. मध्य प्रदेशातील धाकड साहेब व्हायरल झाले असताना, आता राजस्थानचे साहेबही चर्चेत आले आहेत. त्यावेळी एक्सप्रेसवे कर्मचाऱ्यांनी धाकड साहेबांना कॅमेऱ्यात रंगेहाथ पकडले आणि या घटनेत पत्नीने स्वत: आपल्या मुख्याध्यापक पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडले.