ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! 24 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण, 'इतक्या' रुपयांनी झालं स्वस्त

मुंबई तक

Today Gold Rate : आज सोमवारी 26 मे 2025 रोजी सोन्याच्या दरात घट झाल्याचं समोर आलं आहे. एमसीक्स गोल्ड इंडेक्सवर सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 496 रुपयांनी घसरले आहेत.

ADVERTISEMENT

Today Gold Rate In Maharashtra (फोटो - Grok AI)
Today Gold Rate In Maharashtra (फोटो - Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! 24 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण

point

'इतक्या' रुपयांनी सोनं झालं स्वस्त

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे भाव जवळपास 3 हजार रुपयांनी वाढले आहेत. पण आज सोमवारी 26 मे 2025 रोजी सोन्याच्या दरात घट झाल्याचं समोर आलं आहे. एमसीक्स गोल्ड इंडेक्सवर सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 496 रुपयांनी घसरले आहेत. तसच एमसीएक्सवर चांदीच्या किंमतीतही प्रति किलोग्रॅम मागे 102 रुपयांची घट झाली आहे. 

इंडियन बुलियन असोसिएशनच्या (IBA) आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 96390 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 88358 रुपयांवर पोहोचले आहेत. आज चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम 98200 रुपये झाली आहे. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

मुंबई 

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97640 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89500 रुपयांवर पोहोचले आहेत. 

पुणे 

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97640 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89500 रुपयांवर पोहोचले आहेत. 

हेही वाचा : भुयारी मेट्रोचा पहिल्याच पावसात खेळखंडोबा! मुंबईकरांचा संताप, प्रशासनावर चिडले

नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97470 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89530 रुपयांवर पोहोचले आहेत. 

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97640 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89530 रुपयांवर पोहोचले आहेत. 

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97640 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89530 रुपयांवर पोहोचले आहेत. 

हेही वाचा : मान्सून मुंबईत दाखल, नेहमीपेक्षा तब्बल 12 दिवस लवकर, हवामान खात्याने काय म्हटलं?

सोलापूर

सोलापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97640 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89530 रुपयांवर पोहोचले आहेत. 

कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97640 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89530 रुपयांवर पोहोचले आहेत. 

नागपूर

नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97640 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89530 रुपयांवर पोहोचले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp