Personal Finance: लग्नासाठी Personal Loan मिळेल पण 5 गोष्टी लक्षात ठेवल्या नाही तर...
Personal Finance Tips Loan for Wedding: जर तुम्ही लग्नासाठी कर्ज शोधत असाल तर तुम्ही Personal Loan घेऊ शकता. पण, याचा व्याजदर हा खूप जास्त आहे. जाणून घ्या याविषयी खास टिप्स.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. आपल्याला माहिती आहे की, भारतात लग्नासाठी खूप खर्च येतो. कधीकधी पैशांची व्यवस्था करणे कठीण होते. अचानक नवीन गरज निर्माण झाली की समस्या आणखी बिकट होते. अशा परिस्थितीत, लग्नासाठी आवश्यक असलेल्या पैशांची व्यवस्था कर्ज घेऊन करता येते. अनेक बँका आणि एनबीएफसी लग्नासाठी कर्ज देतात.
जर तुम्ही लग्नासाठी कर्ज घेतले तर त्यासाठी वेगळा नियम नाही. बँका किंवा एनबीएफसी लग्नासाठी Personal Loan देतात. क्रेडिट स्कोअर किंवा उत्पन्नानुसार, 50 हजार ते 30 लाख रुपयांचे Personal Loan घेता येते. त्याच वेळी, काही बँका किंवा एनबीएफसी 30 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज देतात.
या 5 गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्ही लग्नासाठी वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर 5 गोष्टी अजिबात विसरू नका
1. व्याजदराबद्दल विचारा
Personal Loan हे एक असुरक्षित कर्ज आहे. बँका यावर खूप जास्त व्याज आकारत असतात. हे दरवर्षी 10 ते 15 टक्के असू शकते. अशा परिस्थितीत, EMI भरणे खूप महागडं ठरतं. तुम्ही जिथे कर्जासाठी अर्ज करणार आहात त्यांचा व्याजदर किती आहे हे विचारायला अजिबात विसरू नका. तसंच कमी व्याजदर असलेल्या बँकेकडून किंवा एनबीएफसीकडून कर्ज घेण्यास प्राधान्य द्या.









