Govt Job: 7 वी पास ते ग्रॅज्यूएट्स असलेल्यांना सरकारी बँकेत नोकरीची संधी; काय आहे अर्जाची शेवटची तारीख?
यूनियन बँक ऑफ इंडिया (UBI) कडून तरुणांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवार 2 जुलै 2025 पर्यंत ऑफलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

7 वी पास उमेदवारांसाठी देखील सरकारी बँकेत नोकरी

यूनियन बँक ऑफ इंडियाकडून नव्या भरतीची जाहीरात

कोणत्या पदांसाठी निघाली भरती?
Union Bank Recruitment: बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नात असलेल्या उमेदवारांना यूनियन बँक ऑफ इंडिया (UBI) ने नव्या भरतीची जाहीरात जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवार 2 जुलै 2025 पर्यंत ऑफलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. यूनियन बँकने ऑफिस असिस्टंट, अटेंडर, माळी आणि फॅकल्टी सारख्या विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
या भरतीची विशेष बाब म्हणजे यामध्ये 7 वी पास ते पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्यूएशन) पर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. कमीत कमी 7 वी पास पात्रता असलेले उमेदवार सरकारी बँकेत नोकरी मिळवू शकतात.
वयोमर्यादा
अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं वय कमीत कमी 22 वर्षे तर जास्तीत जास्त 40 वर्षे असायला हवं. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
हे ही वाचा: ढाब्यावरचं ते जेवण शेवटचं ठरलं! संभाजीनगरमध्ये कारचा अपघात, तीन मित्र जागीच ठार, तर दोघे...
शैक्षणिक पात्रता
पदानुसार या भरतीमध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. फॅकल्टी पदासाठी उमेदवाराकडे ग्रॅज्यूएशन किंवा पोस्ट ग्रॅज्यूएशनची डिग्री असणं अनिवार्य आहे. ऑफिस असिस्टंट पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्यूएट असण्यासोबत कंप्यूटर आणि बेसिक अकाउंटिंगचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच अटेंडर पदासाठी 10 वी पास आणि माळीच्या पोस्टसाठी केवळ 7 वी पास पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
हे ही वाचा: "काढ व्हिडीओ, मी नाही घाबरत...", वकिलांशीही अरेरावी, ट्राफिक पोलीस कॉन्स्टेबलचा दुसरा व्हिडीओ
वेतन
भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांनी दर महिन्याला चांगलं वेतन दिलं जाईल.
- फॅकल्टी: 30,000 रुपये मासिक वेतन
- ऑफिस असिस्टंट: 20,000 रुपये मासिक वेतन
- अटेंडर: 14,000 रुपये मासिक वेतन
- माळी: 12,000 रुपये मासिक वेतन
अर्जाची प्रक्रिया
1. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाइन माध्यमातून होणार आहे.
2. यासाठी उमेदवार यूनियन बँकच्या unionbankofindia.co.in 3. या अधिकृत वेबसाइटवर फॉर्म डाउनलोड करू शकतात.
4. यानंतर योग्य पद्धतीने अर्ज भरून तो आवश्यक डॉक्यूमेंट्स सोबत दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.