कोकणासह रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, जाणून घ्या हवामान
Maharashtra Weather : हवामान विभागाने 24 जून रोजी मान्सूनची परिस्थिती कशी असेल याबाबतची महत्त्वाची अपडेट दिली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने हवामानाचा सविस्तर अंदाज वर्तवला आहे. तसेच मान्सूनची प्रगती, हवामान प्रणालीची माहिती दिली आहे. याची एकूण माहिती ही पुढील प्रमाणे आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हवामान विभागाकडून मान्सूनचा अंदाज जारी
मान्सूनची महत्त्वाची अपडेट समोर
Maharashtra Weather : हवामान विभागाने 24 जून रोजी मान्सूनची परिस्थिती कशी असेल याबाबतची महत्त्वाची अपडेट दिली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने हवामानाचा सविस्तर अंदाज वर्तवला आहे. तसेच मान्सूनची प्रगती, हवामान प्रणालीची माहिती दिली आहे. याची एकूण माहिती ही पुढील प्रमाणे आहे.
हेही वाचा : हनिमूनच्या दिवशी पती जवळ आला, तेव्हाच पत्नीला झाली पुतण्याची आठवण अन्...
कोकण विभाग
प्रादेशिक हवामानात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा समावेश आहे. यापैकी कोकण भागातील मुंबई, रायगड आणि रत्नागिरीत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी पावसाचे पाणी साचण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होईल अशी शक्यता आहे. तसेच समुद्रकिनारी जाणं टाळावं, असा हवामान विभागाने इशारा वर्तवला आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यातील पुणे आणि साताऱ्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात ढगाळ वातावरण असून जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाड्यातील बीड, नांदेड, हिंगोली, लातूर आणि धाराशिवमध्ये मध्यम ते हलका पाऊस राहिल. तर काही ठिकाणी जोराचा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, या भागांमध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. शेतीसाठी पाण्याच्या उपलब्धतेत वाढ होईल.