सावधान! घरातून बाहेर पडताय? मुंबईत कोसळणार धो धो पाऊस; कोणत्या भागात साचणार पाणी?
Mumbai Weather Today : 24 जून 2025 रोजी मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईत कोणत्या भागात बरसणार पावसाच्या सरी?
रेल्वेच्या वेळापत्रकावर होणार परिणाम?
कसं असेल मुंबईचं आजचं हवामान?
Mumbai Weather Today : 24 जून 2025 रोजी मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. उपलब्ध माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः खालील भागांमध्ये पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे.
कसं असेल मुंबईचं आजचं हवामान?
सखल भाग: माहीम, परळ, दादर, अंधेरी, कुर्ला, वांद्रे, हिंदमाता, सायन, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, पवई, मुलुंड यासारख्या सखल भागात पाणी साचण्याचा धोका जास्त आहे, कारण या ठिकाणी मुसळधार पावसामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येऊ शकतो.
नवी मुंबई: वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, आणि घनसोली या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक असेल.
ठाणे: ठाणे शहरातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
भरती-ओहोटी: 24 जून 2025 रोजी सकाळी 11:03 वाजता 4.35 मीटरची भरती आणि सायंकाळी 05:02 वाजता 1.90 मीटरची ओहोटी अपेक्षित आहे. भरतीच्या वेळी समुद्रकिनारी पाणी साचण्याची शक्यता आहे, त्यामुळे किनारी भागात सावधगिरी बाळगावी.










