Govt Job: मेडिकल फिल्डमध्ये मिळवा सरकारी नोकरी! पगार तर... कसा कराल अर्ज?

मुंबई तक

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (DMER) कडून 'ग्रुप-C' म्हणजेच 'क' श्रेणीतील एकूण 1107 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती महाराष्ट्रातील विविध सरकारी मेडिकल कॉलेज आणि संस्थांच्या माध्यमातून केली जाईल.

ADVERTISEMENT

मेडिकल फिल्डमध्ये मिळवा सरकारी नोकरी! पगार तर...
मेडिकल फिल्डमध्ये मिळवा सरकारी नोकरी! पगार तर...
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीची मोठी संधी

point

DMER कडून मेडिकल पदांसाठी बंपर भरती

point

वैद्यकीय क्षेत्रात कोणत्या पदांसाठी कराल अर्ज?

DMER Recruitment 2025: वैद्यकीय म्हणजेच मेडिकल फिल्डमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (DMER) कडून 'ग्रुप-C' म्हणजेच 'क' श्रेणीतील एकूण 1107 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती महाराष्ट्रातील विविध सरकारी मेडिकल कॉलेज आणि संस्थांच्या माध्यमातून केली जाईल. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार www.med-edu.in या DMER च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. 

'या' पदांसाठी भरती

या भरतीमध्ये लॅबोरेटरी असिस्टंट, ड्राइव्हर, डाटा एंट्री ऑपरेटर, टाइपिस्ट, एक्स-रे असिस्टंट, फार्मासिस्ट, डाइटीशियन, लाइब्रेरियन, ऑफिसर, डेंटल टेक्नीशियन आणि इतर टेक्निकल आणि प्रशासकीय पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता निश्चित केली गेली आहे. 

पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 10 वी उत्तीर्ण, 12 वी उत्तीर्ण, डिप्लोमा, बीएससी (Bsc), एमएससी (Msc), एमकॉम (M.Com), एमए (M.A) आणि एमएसडब्ल्यू (MSW) यांसारख्या शैक्षणिक पात्रता असायला हव्यात. ड्रायव्हर पदासाठी, वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि जड वाहने चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांना अर्ज करताना संबंधित प्रमाणपत्रे देखील अपलोड करणं अनिवार्य आहे.

वेतन

पदानुसार वेतन निश्चित करण्यात आलं आहे. काही वरिष्ठ पदांवर नियुक्त झालेल्या उमेदवारांना 38,600 ते 1,22,800 रुपये मासिक वेतन मिळेल, तर मध्यम-स्तरीय टेक्निकल आणि मेडिकल पदांसाठी 29,200 ते 92,300 रुपये वेतन निश्चित करण्यात आलं आहे. तसेच ग्रुप-C च्या DEO, टायपिस्ट आणि ड्रायव्हरच्या पदांसाठी 19,900 ते 63,200 रुपये वेतन दिलं जाईल.