दरीत तलाठी आणि विद्यार्थीनीचा मृतदेह, वरती चपला आणि पांढरी गाडी... जुन्नरमध्ये खळबळ, घटना काय?
एक पांढऱ्या रंगाची कार उभी असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं. यानंतर ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता, दरीच्या कठड्याच्या टोकावर एक पुरुष आणि एका स्त्रीच्या चपला आढळून आल्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जुन्नरच्या दुर्गावाडी गावाजवळ सापडले दोन मृतदेह

तलाठी आणि महाविद्यालयीन तरूणी असल्याची माहिती

जुन्नरमध्ये मोठी खळबळ, पोलिसांचा तपास सुरू
पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात 1200 फूट खोल दरीत दोन मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) आणि महाविद्यालयीन तरुणी रूपाली संतोष खुटाण (आंबोली, ता. जुन्नर) यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी या दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, दोघांनी टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नेमकी घटना काय?
जुन्नर पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह दरीतून बाहेर काढण्यासाठी जुन्नर पोलिस आणि रेस्क्यू टीमने कठीण परिस्थितीत शोधकार्य हाती घेतले. दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे नोंदवली होती. रामचंद्र पारधी हे मूळचे दुर्गावाडी येथील रहिवासी असून, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता होते, याबाबत त्यांच्या पत्नीने अहमदनगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दुसरीकडे, रूपाली खुटाण ही देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता.
हे ही वाचा >> "लय घाण बोलेन...", म्हणत कानाखाली मारली, महिला पोलिसाची ट्रिपल सिट स्कुटी पळवणाऱ्या मुलींना शिवीगाळ
पांढरी गाडी आणि चपलांमुळे संशय
जुन्नर येथील रिव्हर्स वॉटर फॉलजवळ काही दिवसांपासून एक पांढऱ्या रंगाची कार उभी असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं. यानंतर ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता, दरीच्या कठड्याच्या टोकावर एक पुरुष आणि एका स्त्रीच्या चपला आढळून आल्या. रविवारी (22 जून 2025) दाट धुके, पाऊस आणि अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. सोमवारी (23 जून 2025) सकाळी रेस्क्यू टीमने दरीत उतरून सर्वत्र शोध घेतला, तेव्हा रामचंद्र आणि रूपाली यांचे मृतदेह आढळून आले. रेस्क्यू टीमने अत्यंत खडतर परिस्थितीत मृतदेह दरीतून बाहेर काढले.
जुन्नर रेस्क्यू टीमने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवले. या ऑपरेशनदरम्यान रेस्क्यू टीमला दरीच्या खडतर परिस्थितीचा सामना करावा लागला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.