Weight Loss : व्यायाम सोडा अन् मक्याची चपाती खा, झटपट वजन होईल कमी
हिवाळ्यात गहू सोडा आणि मक्याची चपाती खायला सुरुवात करा. दरम्यान या मक्याची चपाती खाण्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
Benefits of Corn Flour : वजन कमी करण्याचे अनेक पर्याय आहेत. तुम्ही जीम लावून डाएट करू शकता. अथवा रोज धावायलाही जाऊ शकता. पण व्यायामापेक्षा काही गोष्टी खुप असरदार असतात. ज्यांचा समावेश तुम्ही तुमच्या डाएटमध्ये केल्यास तुमचं वजन तर घटेलच त्यासोबत आरोग्याच्या अनेक समस्या दुर होतात. अशीच एक गोष्ट म्हणजे, मक्क्याची चपाती. त्यामुळे हिवाळ्यात गहू सोडा आणि मक्याची चपाती खायला सुरुवात करा. दरम्यान या मक्याची चपाती खाण्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
वजन होते कमी
मोहरीच्या भाजीसोबत मक्याची चपाती खाण्याची मजाच वेगळी आहे. ही चपाती खाल्याने वजन लवकर कमी होते. जर व्यायाम करून देखील तुमचं वजन कमी होत नसेल तरी ही मक्याची चपाती नक्की ट्राय करा.नेहमीची गव्हाची चपाती खाण्यापेक्षा मक्याची चपाती खाल्ल्याने शरीर मजबूत आणि ताकदवर बनते. तसेच मक्याच्या चपातीसोबत मोहरी, पालक किंवा इतर हिरव्या भाज्या प्रथिने, फायबर आणि लोह यांच्यात महत्वाचे प्रथिने असतात.मक्याची चपाती हे कॅलरी फुड आहे. ज्यामुळे फॅट लवकर बर्न होते. तसेच यात खुप जास्त फायबर असतं, जे भूक कंट्रोलमध्ये ठेवते आणि तुम्ही कमी खाऊ लागता.
हे ही वाचा : MLA Disqualification : ‘ही पद्धत पक्षपाती”, ठाकरे गटाचा विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप
बद्धकोष्ठता आणि मुळव्याधचा धोका दूर
बद्धकोष्ठता आणि मुळव्याध हा एकमेकांशीच जोडलेला आजार आहे. पण मक्याची रोटी खाणाऱ्यांनी या आजारांची चिंता सोडावी. कारण मक्क्यात असणारे फायबर मल मऊ करते आणि ते सहजरीत्या बाहेर पडते. आणि पोटही साफ राहते.
हे वाचलं का?
ग्लूटेन मुक्त
मक्याचे पीठ पूर्णपणे ग्लूटेन मु्क्त आहे. ज्यामुळे ते प्रत्येकासाठी आरोग्यदायी आहे. ग्लूटेन संवेदनशीलता आणि सिलिकओ रोग असलेले रूग्ण कोणत्याही जोखमीशिवाय खाऊ शकता. या रूग्णांना गहू आणि त्याचे पीठ धोकादायक असू शकते.
विटामिन आणि मिनरल
मक्याच्या पीठात पोषणाची कोणतीच कमी नाही आहे. युएसडीएनुसार, यामध्ये प्रोटीन,फायबरसोबत कॅल्शिअम, आयरन,मॅग्नेशिअम, फॉस्फोरस,पोटॅशिअम,झिंक, कॉपर, विटामीन सी, विटामीन बी आणि विटामीन अ भरपूर प्रमाणात असते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Virat Kohli-Rohit Sharma : गुडन्यूज! विराट-रोहितला वर्ल्ड कपमधील कामगिरीचं मिळालं फळ
म्हातारपणाची लक्षणे होतील दुर
मक्याचे पीठ हे कार्बोहायड्रेटचा एक चांगला सोर्स आहे. ज्यामुळे तुम्हाला नेहमी ऊर्जा मिळत असते. त्यात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे अँटीऑक्सिडंट देखील असतात, जे वृ्द्धत्वाची लक्षणे नियंत्रित करतात.
ADVERTISEMENT
हृदयाचे आजारापासून बचाव
हृदयविकाराचे वाढते प्रमाण पाहता डाएटमध्ये मक्याच्या चपातीचा समावेश केला पाहिजे. जो हदयाशी संबंधित आजारांना दुर करतो. मक्याची चपाती विद्राव्य फायबरसह खराब कोलेस्टेरॉल कमी करते आणि हृदयविकार टाळते.
वरील माहिती ही सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. त्यामुळे या गोष्टीचा अवलंब करण्यापु्र्वी डॉक्टरांचा एकदा सल्ला घ्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT