नवरा टेरेसवर झोपला होता, 3 पोरांच्या आईनं प्रियकराला बोलावलं, रुममधून आवाज आला अन्...

मुंबई तक

Shocking Love Story Viral :उत्तर प्रदेशच्या महराजगंज जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. तीन पोरांची आई असलेल्या महिलेनं नवरा टेरेसवर झोपलेला असताना धक्कादायक कृत्य केलं.

ADVERTISEMENT

Married Women Love Story Viral
Married Women Love Story Viral
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विवाहित महिलेच्या प्रेमप्रकरणामुळे सर्वत्र उडाली खळबळ

point

पती टेरेसवर झोपलेला असताना पत्तीने प्रियकराला घरात बोलावलं अन्..

point

सर्वांना जाग आल्यावर रुममध्ये घडली धक्कादायक घटना

Shocking Love Story Viral :उत्तर प्रदेशच्या महराजगंज जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. तीन पोरांची आई असलेल्या महिलेनं नवरा टेरेसवर झोपलेला असताना धक्कादायक कृत्य केलं. संधी मिळताच या महिलेनं प्रियकराला रुममध्ये बोलावलं. पतीला जराही अंदाज आला नाही की, त्याच्या पत्नीने लाजिरवाणा प्रकार केला आहे. पती झोपलेला असताना त्याच्या पत्नीनं प्रियकराला रुममध्ये तर बोलावलं पण नंतर असं काही घडलं जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

असा झाला या घटनेचा पर्दाफाश

ही घटना गेल्या सोमवारी घडल्याचं सांगितलं जात आहे. भीषण गरमी असल्यानं थंडावा मिळवण्यासाठी महिलेचा पती टेरेसवर झोपायला गेला होता. पती छतावर जाताच पत्नीने संधी साधून तिच्या प्रियकराला रुममध्ये बोलावलं. दोघेही घरातील रुममध्ये असताना अचानक एका भांड्याचा जोरात आवाज झाला. हा आवाज ऐकून घरातील अन्य सदस्य आणि छतावर झोपलेला पती जागा झाला.

हे ही वाचा >> 24th May 2025 Gold Rate : ग्राहकांनो! आज तर तुमची दिवाळीच, महागलेलं सोनं झालं स्वस्त, भाव वाचून खुश व्हाल

आवाज ऐकताच पती लगेच रुमकडे धावत गेला आणि समोरचं दृष्य पाहून त्याला धक्काच बसला. पत्नीला त्या परिस्थितीत पाहून पतीने आरडाओरडा केला. त्यानंतर शेजारी राहणारे लोकही त्या ठिकाणी पोहोचले. पतीने या घटनेबाबत पोलिसांनाही कळवलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला पोलीस स्टेशनला नेलं. 

पत्नीचा धक्कादायक निर्णय

पोलीस ठाण्यात जेव्हा दोन्ही बाजूंनी चर्चा झाली, तेव्हा महिलेनं सर्वांनाच धक्का दिला. महिला म्हणाली, मला पतीसोबत राहायचं नाही. मी प्रियकरासोबत राहणार आहे. या संपूर्ण प्रकारानंतर महिलेची तिनही मुलं जोरजोरात रडू लागले. मुलांना रडताना पाहूनही महिलेनं निर्णय बदलला नाही. तिने प्रियकरासोबतच जाण्याच अंतिम निर्णय घेतला. या संपूर्ण घटनेबाबत पोलीस अधिक्षक सोमेंद्र मीणा यांनी माहिती दिली की, महिला आणि तिचा प्रेमी दोघांनाही त्यांच्या परस्पर सहमतीमुळं सोडून दिलं आहे. महिलेच्या पतीनेही मुलांची जबाबदारी घेण्याचं म्हटलं आहे. 

हे ही वाचा >> Personal Finance: तुमचे पैसे डबल करण्यासाठी 'या' आहेत भन्नाट स्कीम

हे वाचलं का?

    follow whatsapp