Video: ट्रेनमध्ये महिला प्रवाशांमध्ये कुटाकुटी, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, डोकं फोडलं! घडलं तरी काय?

मिथिलेश गुप्ता

Women Fight Viral Video : सर्वसामान्य लोकांची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली.

ADVERTISEMENT

Women Fight In The Train Video Viral
Women Fight In The Train Video Viral
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

point

महिला प्रवाशांनी एकमेकींचं डोकं फोडलं, नंतर..

point

त्या ट्रेनमध्ये महिला प्रवाशांमध्ये नेमकं घडलं तरी काय?

Women Fight Viral Video : सर्वसामान्य लोकांची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. महिला डब्यात जोरदार राडा झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांमध्ये किरकोळ वाद सुरु होता. परंतु, वाद करणाऱ्या महिलांचा राग प्रचंड वाढला आणि किरकोळ भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं.

महिलांनी एकमेकिंच्या झिंज्या ओढत थप्पडही मारल्या. इतकच नव्हे तर महिलांनी एकमेकींच्या डोक्यावरही हल्ला केला. त्यामुळे काही महिला जखमी झाल्या. ही घटना कोणत्या लोकलमध्ये घडली, याबाबत अद्यापही स्पष्ट माहिती समोर आली नाहीय. दरम्यान, याप्रकरणी कल्याण पोलिसांकडून व्हायरल व्हिडीओचा तपास सुरु करण्यात आला आहे.

महिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल

लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला. ही घटना मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे की हार्बर रेल्वेच्या हद्दीत घडली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीय. 
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही प्रवाशांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. वैयक्तीक कारणावरून हा वाद झाला असावा, असं काही लोकांनी म्हटलं आहे. 

अशाप्रकारे व्हिडीओ नेहमीच होतात व्हायरल..

लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादविवाद होतच असतात. विंडो सीटवरून प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. महिला प्रवाशांमध्ये झालेल्या वादाचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. सार्वजनिक ठिकाणी राडा करणाऱ्या महिलांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp