Wrestlers Protest Youth Congress : आंदोलनाची धग सचिन तेंडुलकरच्या दारापर्यंत!

मुंबई तक

ADVERTISEMENT

wrestlers protest : Sachin Tendulkar Questioned by Mumbai Youth Congress
wrestlers protest : Sachin Tendulkar Questioned by Mumbai Youth Congress
social share
google news

wrestlers protest update : दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीपूटंच्या आंदोलनाची धग मुंबईपर्यंत पोहोचली आहे. दिल्लीत 28 मे रोजी कुस्तीपटूंच्या धरपकडीनंतर मोदी सरकारला टीकेचे धनी ठरत आहे. बुधवारी याची धग सचिन तेंडुलकरपर्यंत पोहोचली. सचिन तेंडुलकरच्या मुंबईतील घराबाहेर मोठे होर्डिग लावण्यात आले. त्यातून सचिनला काही प्रश्न विचारण्यात आले. हे होर्डिंग पोलिसांनी माहिती मिळताच हटवले. (wrestlers protest : Sachin Tendulkar Questioned by Mumbai Youth Congress)

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कुस्तीपटूंकडून केली जात आहे. साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांच्यासह इतर कुस्तीपटूही जंतरमंतर येथे निदर्शने करत होते. 28 मे रोजी नव्या संसद भवनावर मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यावेळे पोलिसांनी खेळाडूंना फरफटल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

हेही वाचा >> राज ठाकरेंनी ब्रिजभूषण सिंहांच्या विरोधात थोपटले ‘दंड’! PM नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र

याच प्रकारानंतर मुंबई प्रदेश युवक काँग्रेसने सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर मोठे होर्डिंग लावले. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. या होर्डिंगमधून काँग्रेसने सचिन तेंडुलकरला प्रश्न विचारले असून, शेतकरी आंदोलनादरम्यान, जगभरातून उमटलेल्या प्रतिक्रियांवर सचिनने मांडलेल्या भूमिकेचीही आठवण काँग्रेसने करून दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर लावलेल्या होर्डिंगवर काय?

– “मत विरहित भारतरत्न सचिन तेंडुलकरजी भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये तुम्ही मूग गिळून गप्प का?
शेतकरी आंदोलनावर बोलणाऱ्या परकीय महिला खेळाडूनला सणसणीत उत्तर तुम्ही दिलं होतं की आमच्या देशांतर्गत प्रश्नात तू नाक खुपसू नको… आणि आज मात्र सचिन तुझे तेच देश प्रेम कुठे गेले आहे??”

– “सीबीआय… इन्कम टॅक्स या सगळ्यांच्या धाडी पडतील म्हणून तू कुठल्यातरी दबावाखाली आहेस का?”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Maharashtra Politics : शिंदेंच्या खासदाराची ‘ही’ मागणी शिवसेना-भाजप सरकारचं टेन्शन वाढवणार?

– “क्रीडा विश्वातील तुम्ही देव माणूस आहात. एक भारतरत्न देखील आहेत मात्र जेव्हा खेळ विश्वातील काही महिला लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत तेव्हा मात्र आम्हाला तुमच्यातील माणूस आणि तुमच्यातील माणुसकी कोठेही दिसून येत नाही.”

ADVERTISEMENT

congress put hording next to sachin tendulkar house on issue of wrestlers protest
मुंबई काँग्रेसने सचिनला काही प्रश्न विचारले आहेत.

राज ठाकरेंचं मोदींना पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे. घरापासून जवळच हे आंदोलन सुरू असून, त्याची माहिती आहे, त्यामुळे प्रधानसेवक म्हणून या विषयात लक्ष द्यावं, अशी राज ठाकरेंनी केली.

“भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना 28 मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, ही नम्र विनंती”, असं म्हणत राज यांनी दीर्घ पत्र मोदींना लिहिलेलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT