‘देवेंद्रजी, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती’, सुप्रिया सुळेंचं फडणवीसांच्या ‘त्या’ भूमिकेवर बोट

मुंबई तक

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदींनी केलेल्या विधानांमुळे भाजपची कोंडी झाली असून, विरोधकांनीही भाजपला खिंडीत पकडल्याचं राज्यात दिसत आहे. त्यात या वादावर देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेवरही विरोधकांकडून टीका होत आहे. सुप्रिया सुळेंनीही यावरून फडणवीसांना लक्ष्य केलंय. पुण्यातल्या नवले ब्रिजवर रविवारी अपघात झाला. खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदींनी केलेल्या विधानांमुळे भाजपची कोंडी झाली असून, विरोधकांनीही भाजपला खिंडीत पकडल्याचं राज्यात दिसत आहे. त्यात या वादावर देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेवरही विरोधकांकडून टीका होत आहे. सुप्रिया सुळेंनीही यावरून फडणवीसांना लक्ष्य केलंय.

पुण्यातल्या नवले ब्रिजवर रविवारी अपघात झाला. खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर मांडलेल्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना टोला लगावला.

राज्यपालांच्या बोलण्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले : वादावर फडणवीस आणखी काय म्हणाले?

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्ही केलं तर चूक असतं आणि त्यांनी केलं तर मनात तसं नसतं. त्याच्यामुळे डबल स्टॅण्डर्स त्याचे आहेत. देवेंद्रजी काय करतील. त्यांना शेवटी बिचाऱ्यांना डिफेंड करायला लागतं असेल. दिल्लीवरून कुणाचा फोन आला असेल, मला माहिती नाही. पण हे दुर्दैव आहे”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीये.

हे वाचलं का?

    follow whatsapp