Ravindra Dhangekar : "तुम्ही पुणे उद्ध्वस्त केलंय, लाज कशी...", धंगेकरांचा रुद्रवतार!
MLA Ravindra Dhangekar Video : रवींद्र धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. धंगेकरांचा पारा चांगलाच चढला होता.

ADVERTISEMENT
Ravindra Dhangekar Pune accident News : कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा रुद्रवतार आज बघायला मिळाला. पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना धंगेकरांनी धारेवर धरले. पब आणि क्लबकडून अधिकाऱ्यांना हफ्ते मिळत असल्याचा दावा करत धंगेकर यांनी यादीच वाचून दाखवली. (Ravindra Dhangekar Gets angry on State revenue Department superintendent)
रवींद्र धंगेकरांनी अधिकाऱ्याला झापले?
धंगेकरांनी अधिकारी हफ्ते घेत असल्याचे आरोप केला. त्यावर अधिकाऱी म्हणाले की खोटं आहे हे. त्यानंतर धंगेकरांचा चांगलाच पारा चढला.
हेही वाचा >> डॉक्टरला 3 लाखांची लाच देणाऱ्याला अटक; पुणे पोलिसांची कारवाई
ते म्हणाले, "आमदार म्हणून बोलतोय. तुम्ही काय स्वतःला शहाणे समजता का? उद्ध्वस्त केलं पुणं तुम्ही. तुम्हाला लाज कशी वाटत नाही. मला म्हणता खोट आहे. तुम्ही काय विधानसभेत उत्तर द्यायला उभे राहिलात का माझ्याशी?", अशा शब्दात धंगेकर यांनी सुनावले.
धंगेकरांनी वाचून दाखवली यादी
पुण्यातील नाईट लाईफला पाठीशी घालणाऱ्या सुपरीटेंडंट राजपूत यांना साधारण महिन्याचे प्रत्येक हॉटेलमधून पैशाचे पाकीट पुरवले जाते, असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.