Trimbakeshwar Controversy : काय आहे तुकाराम पालखीचं दर्गा कनेक्शन? - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / Trimbakeshwar Controversy : काय आहे तुकाराम पालखीचं दर्गा कनेक्शन?
बातम्या शहर-खबरबात

Trimbakeshwar Controversy : काय आहे तुकाराम पालखीचं दर्गा कनेक्शन?

Trimbakeshwar temple incident : the Bhakti Sangam between Sant Tukaram Maharaj and Hazrat Syed Angadshah Baba came into the news.

संदल मिरवणुकीदरम्यान धूप दाखविण्याच्या प्रकरणामुळे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर चर्चेत आहे. गावकऱ्यांनी ही अनेक वर्षांपासूनची परंपरा असल्याचं म्हटलं आहे, दुसरीकडे यावरून राजकारणही होताना दिसत आहे. मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली गेली, तर दुसरीकडे सर्वच प्रमुख नेत्यांनी धूप दाखविण्याची परंपरा पूर्वापार असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्वधर्म समभाव ही फार जुनी परंपरा राहिली आहे. ज्याची अनेक उदाहरणं ही आपल्याला पाहायाला मिळतात. पण आपण अशा दोन उदाहरणांबाबत जाणून घेणार आहोत की, जी अशा वादांना फाटा देऊन समाजातील एकोपा टिकवून ठेवायला मदत करतात.

तुकोबारायांच्या पालखीचा अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात मुक्काम

वारकरी सांप्रदाय हा महाराष्ट्रातील सर्वात जुना सांप्रदाय आहे. या सांप्रदायाने कायमच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राची आध्यात्मिक जडणघडण घडवली आहे. संत परंपरेचा वारसा लाभलेल्या या महाराष्ट्रात वारकरी सांप्रदाय आपल्या चालीरीतींमधून समाजासमोर नेहमीच आदर्श निर्माण करत आलाय. या सांप्रदायाची सर्वधर्म समभावाची एक शिकवण देखील आजच्या समाजकंठकांना एक प्रकारचं जळजळीत अंजनच आहे.

एकीकडे सध्या धर्माधर्मात तेढ निर्माण होत असला तरी दुसरीकडे वारकरी सांप्रदाय हा आपल्या ‘बोले तैसा चाले’ या उक्ती प्रमाणेच कृती करत असल्याचं पाहायला मिळतं. याची सुरुवात ही तुकोबा महाराजांच्या पालखीपासून सुरू होते.

हेही वाचा >> त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न?, फडणवीसांकडून थेट SIT चौकशीचे आदेश

आषाढी एकादशीसाठी तुकोबा महाराजांची जेव्हा पालखी देहूमधून निघते तेव्हा ती सगळ्यात आधी जवळच्या अनगडशाह बाबा यांच्या दर्गात जाते. इथे असलेल्या दर्ग्यासमोरील मेघडंबरीत तुकोबारायांची पालखी ठेवली जाते. ही मेघडंबरी ही अभंग आरती स्थान म्हणून ओळखलं जातं.

अनगडशाह बाबा यांच्या समाधीसमोर तुकोबारायांची पालखी आल्यानंतर तिथे अभंग गायले जातात. त्यानंतरच पालखी पंढरपूरसाठी रवाना होते.

कोण होते अनगडशाह बाबा

अनगडशाह बाबा हे स्वत: वारकरी सांप्रदायाचे होते. त्यामुळे जेव्हा त्यांचा उरूस भरतो. तेव्हा त्यांचे मुस्लिम भाविक हे दर्ग्यात कोणतीही कुर्बानी देत नाहीत किंवा मांसाहारी पदार्थांचा नैवेद्य दाखवत नाही. ते बाबांच्या समाधीसमोर गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवतात.

लालबागच्या राजाची भेंडीबाजारातही होते आरती

दुसरीकडे असंच एक उदाहरण म्हणजे मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागच्या राजाचं… लालबागचा राजा हा मुंबईसह आता संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. लालाबागच्या राजासाठी संपूर्ण जगातून भाविक हे येत असतात. आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी ते बाप्पाला साकडं घालतात, नवस बोलतात. यावेळी अनेक वेगवेगळ्या जाती-धर्माचे भाविक हे राजाच्या चरणी लीन होतात.

लालबागचा राजा देखील सर्वधर्म समभावचा आदर्श हा समाजासमोर घालून देतो. कारण जेव्हा लालबागच्या राजाची मिरवणूक निघते तेव्हा ती मुंबईतील प्रसिद्ध भेंडीबाजार भागातून निघते. हा बराचसा भाग मुस्लिम बहुल आहे. जिथे लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी तर होतेच पण त्यासोबत येथे सार्वजनिकरित्या आरती देखील होते. ज्यावेळी अनेक मुस्लिम बांधव हे हजर असतात. एवढंच नव्हे तर ते या मिरवणूक सोहळ्यात मनोभावे सहभागी देखील होत असल्याचं दरवर्षी पाहायला मिळतं.

हेही वाचा >> Mahesh Landge: पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची आताच मागणी का होतेय?

या सारख्या कृतीच महाराष्ट्राची सामाजिक, आध्यात्मिक जडणघडण आणि एकोपा कायम ठेवण्यात महत्त्वाच्या ठरत आल्या आहेत. एकप्रकारे सामाजिक वीण देखील मजबूत केलीये. त्यामुळे राज्यात जरी काही आधात्मिकदृष्ट्या अप्रिय घटना घडत असल्या तरीही तुकोबारायांची पालखी, लालबागच्या राजाची मिरवणूक यासारख्या गोष्टी आपली सामाजिक वीण ढिली पढू देत नाही.

आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय 30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक चित्रपटाच्या शुटिंगनंतर हिरो-हिरोईनच्या महागड्या आउटफिट्सचं काय होतं? Akshay Kumar सोबत ‘टिप टिप बरसा पानी’च्या शूटिंगपूर्वी रवीनाने कोणत्या अटी घातल्या? Sara Tendulkar अडीच तास अडकली ट्रॅफिकमध्ये, Video Viral Dinesh Kartik : बायकोने मित्राशीच संसार थाटला, आयुष्य झाले उद्धस्त अन्.. लव्ह की अरेंज मॅरेज? Jaya Kishori ने लग्नाच्या मुद्द्यावर सोडलं मौन! Virat Kohli चा फिटनेस मंत्रा, खातो 90% उकडलेलं अन्न; कारण जाणून तुम्हीही खाल! रवी शास्त्रीसोबत अफेअरची चर्चा, 30 चित्रपट नाकारून ओटीटीवर एन्ट्री! कोण आहे ‘ती’ अभिनेत्री? Sara Ali Khan: महाकालेश्वराच्या दर्शनावरून ट्रोल करणाऱ्यांना साराचं चोख उत्तर, म्हणाली.. Ahmednagar ते ‘अहिल्यानगर’… नव्या नामांतराची रंजक कहाणी बिअर ओतताना कधीच ग्लास तिरपा करू नका, कारण… Vijay Sethupathi : सोशल मीडियावरून जडला जीव; ‘खलनायका’ची रोमँटिक Love story 82 वर्षाच्या अभिनेत्याची 53 वर्ष लहान गर्लफ्रेंड? आता होतेय आई… अंबानींच्या घरी चिमुकलीचं आगमन, श्लेाकाने दिला बाळाला जन्म दारूपासून चार हात लांबच राहतात ‘हे’ बॉलिवूड स्टार, एक तर 80व्या वर्षीही फिट IPL 2023 मध्ये कष्टाचं चीज झालं, ‘या’ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस Nirmala Nawale : अभिनेत्री नाही, तर राष्ट्रवादीच्या… नवरदेवाच्या लुकमध्ये चक्क Elon Musk! पाहिलेत का ‘हे’ खास Photo कोण आहेत IPL च्या टीमचे मालक, किती आहे श्रीमंत?