त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न?, फडणवीसांकडून थेट SIT चौकशीचे आदेश - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न?, फडणवीसांकडून थेट SIT चौकशीचे आदेश
बातम्या शहर-खबरबात

त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न?, फडणवीसांकडून थेट SIT चौकशीचे आदेश

in maharashtra try to force entry into trimbakeshwar temple direct sit probe ordered by devendra fadnavis

Trimbakeshwar Temple Issue: त्र्यंबकेश्वर: महाराष्ट्रातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) गतवर्षीप्रमाणे यंदाही इतर समुदायातील तरुणांनी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. दोन दिवसांपूर्वी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार आता याबाबत सतर्क झालं आहे.

नाशिक पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे, तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्यावर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती.

पोलिसांनी 5 तरुणांना केली अटक

त्याचबरोबर या प्रकरणी नाशिक पोलिसांनी पाच तरुणांना ताब्यात घेतले आहे. नाशिकचे आयजी बीजी शेखर यांनी सांगितले की, ‘त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्तीने प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. ही घटना 13 मे रोजी घडली होती. 10 ते 12 तरुणांनी जबरदस्तीने मंदिरात प्रवेश केल्याची माहिती मंदिर ट्रस्टकडून पोलिसांना मिळाली. त्यांच्याकडे चादर आणि फुलांचे गुच्छ होते.’

हे ही वाचा >> Honeymoon च्या आधी नवरीने दिल्या प्रचंड शिव्या, नेमकं घडलं काय?

याआधी ही घडली होती अशी घटना

त्र्यंबकेश्वर मंदिरात गैर-हिंदू समाजाच्या लोकांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असा प्रयत्न झाला होता. खरे तर गेल्या वर्षी एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी मुख्य दरवाजातून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

हे ही वाचा >> Ulhasnagar : मासिक पाळीचं रक्त पाहून खवळला अन् भावाने 12 वर्षाच्या बहिणीला संपवलं!

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने पोलिसांना दिलेलं पत्र जसंच्या तसं…

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने त्र्यंबकेश्वर पोलिसांना याबाबत तात्काळ तक्रारीचं पत्र दिलं आहे. तेच पत्र जसंच्या तसं..

दिनांक 13/05/2023 रोजी रात्री सुमारे 9.41 मिनिटांच्या दरम्यान, श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महाद्वार येथे स्थानिक संदल निमित्त निघालेल्या मिरवणुकीतील काही इतर धर्मीय व्यक्तींनी उत्तर महाद्वार येथून श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्नवजा हट्ट केला असता सदर ठिकाणी नियुक्त असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षकांनी सदर व्यक्तींना मज्जाव करून त्यांना अडवले.

वास्तविक श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात घटनेप्रमाणे दर्शनाचे अधिकार हे हिंदू धर्मातील व्यक्तींना देण्यात आलेले आहे. वरील झालेल्या प्रकारामुळे सामाजिक सलोख्यास तेढ निर्माण होण्याचा प्रयत्न होत असल्याचे आम्ही सदर पत्राद्वारे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. तरी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मा. विश्वस्त मंडळाच्या सुचनान्वये मी आपणास विनंती करतो की, आपण कृपया झालेल्या प्रकरणाचा योग्य तो तपास करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी, ही विनंती.

तरी सामाजिक सलोखा व शांतता राखण्याची जबाबदारी असल्याने हा तक्रार अर्ज आपणाकडे विनंतीपूर्वक सादर.

गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्… ऐश्वर्या रायच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही सगळी ‘दुबई’ फिरून याल! दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, ‘मुले जवळ यायला घाबरतात’ अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!