Taiwanese millionaire : 134 करोडची संपत्ती, लग्नाच्या तासाभरात मृत्यू, तरूणासोबत काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

18 year old taiwan millionaire found dead after gay wedding shocking story
18 year old taiwan millionaire found dead after gay wedding shocking story
social share
google news

लग्नाच्या (Marriage) काहीच दिवसात नवऱ्याचा किंवा नवरीचा मृत्यू झाल्याच्या आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत.आता अशीच एक घटना समोर आली आहे.या घटनेत एका करोडपती व्यक्तीची लग्नाच्या काही तासातच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. 18 वर्षीय लाई असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत व्यक्तीला वारसाहक्काने करोडोची संपत्ती मिळाली होती. या संपत्तीतून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे लाईचा मृत्यू नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आता त्याच्या आईकडून(करण्यात येत आहे. दरम्यान नेमकं हे प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात.(18 year old millionaire found dead after gay wedding mother allegation on partner shocking story)

मृत्यूपूर्वी लाईला त्याच्या वडिलांकडून 13.11 मिलियन पाऊंड म्हणजे (134 करोड रूपये) संपत्ती वारसाहक्काने मिळाली होती. ही संपत्ती मिळाल्यानंतर लाईने हसियाशी म्हणजेच गे पार्टनर सोबत लग्न केले होते. हा हसिया लाईच्या वडिलांच्यांच कंपनीत काम करायचाय.यानंतर काही दिवसांनी लाई आणि हसियाने गे वेडिंग केली होती.या लग्नाच्या काही तासानंतर लाईचा मृ्त्यू झाला होता.लाईचा मृतदेह 4 मे रोजी एका अपार्टमेंटच्या बाहेर सापडला होता. त्यामुळे लाईच्या मृत्यूनंतर आईने अनेक प्रश्न उपस्थित करत हसियावर गंभीर आरोप केले होते.

हे ही वाचा : Hyderabad : श्रद्धासारखेच हत्याकांड! दगड फोडायच्या मशीनने केले तुकडे अन् फ्रीजमध्ये ठेवले

इंडिपेंडेंट यूकेच्या रिपोर्टमध्ये स्ट्रेट टाईम्सनुसार, लाईची आई चेनने 19 मे रोजी पत्रकार परीषद घेऊन या मृत्यू प्रकरणावर गंभीर आरोप केले आहेत. माझा मुलगा हा गे नव्हता, असा दावा चेन यांनी केला आहे. तसेच हसियाशी त्याची केवळ दोन वेळाच भेट झाली आहे. हसिया हा लाईच्या वडिलांच्या संपत्तीचे कागदपत्र सांभाळण्याचे काम करायचा. यापुर्वी लाईच्या व़डिलांचे निधन एप्रिलच्या शेवटी झाले होते. तसेच लाईच्या मृत्यूच्या दिवशी हसियाने त्याला रियल इस्टेटचा व्यवसाय सांभाळण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला होताय. यावेळी हसिया आणि लाईने लग्नासाची अर्ज केला होता. या घटनेचा दोन तासानंतर लाईच्या मृत्यूची घटना समोर आली, अशी माहिती त्यांनी दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुलाने आत्महत्या केली आहे ही गोष्ट मी स्विकारू शकत नाही, असे लाई म्हणतो. त्याचसोबत तसेच चेन यांच्या वकिलाने लाईचा संपत्ती अभावी मारण्यात आल्याचा दावा केला आहे. चेन यांच्या आरोपानंतर हसियाची हत्येच्या संशयावरून चौकशी करण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा हसिया आणि त्यांच्या वड़िलांसोबत चर्चा करण्यात आली होती. या चौकशीत हसिया म्हणाला की,लाईच्या आईचे आरोप एकतर्फी आहेत. तसेच या प्रकरणात हसिया वकिलाने जास्त बोलण्यास मनाई केली होती. या चौकशीनंतर £7,865 च्या जातमुचलक्यावर सोडण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सूरू आहे.सेंट्रल ताईवानच्या ताइचुंग शहरात ही घटना घडली आहे.

हे ही वाचा : Crime : चुकीचे इंजेक्शन अन् संशयास्पद मृत्यु, तरूणीसोबत नेमकं काय घडलं?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT