Crime : चुकीचे इंजेक्शन अन् संशयास्पद मृत्यु, तरूणीसोबत नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

nanded nurse suspicious death during treatment family refused to take dead body
nanded nurse suspicious death during treatment family refused to take dead body
social share
google news

नांदेडच्या नायगाव तालुक्यातील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. प्रजापती लांडगे (वय 20) असे या तरूणीचे नाव आहे.या घटनेत चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. तसेच डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. या मागणीसाठी आज सामाजिक संघटना व कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता या प्रकरणात कारवाई होते का? याकडे कुटुंबियांचे लक्ष आहे. (nanded nurse suspicious death during treatment family refused to take dead body)

नायगाव तालुक्यातील कोळंबी गावातील प्रजापती शंकर लांडगे वय (२०) ही नांदेड शहरातील श्री गुरु गोविंदसिंहजी शासकीय रुग्णालयात नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात शिकत होती. 18 मे रोजी वर्ग सुरू असताना अचानक ताप आणि चक्कर आल्याने तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु तिची तब्येत आणखीणच बिघडल्याने प्रजापतीला विष्णुपुरी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र १९ मे रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान प्रजापती लांडगेचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता.

हे ही वाचा : 17 वर्षाच्या वासनांध मुलीचा 2 अल्पवयीन मुलांवर बलात्कार, मुलीची आईही…

या प्रकरणी उपचारा दरम्यान सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला चुकीचे इंजेक्शन दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. तसेच मुलीच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांविरूद्ध नांदेड ग्रामीण व वजिराबाद पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कोणतीही तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यामुळे तिसर्‍या दिवशीही प्रशासनाकडून मुलीचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याउलट मृतक प्रजापती लांडगे हिचे हजारो नातेवाईक आणि दलित समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आणि दोषी डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयात तासनतास धरणे आंदोलन केले. आता याप्रकरणी जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणे गरजेचे झाले आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकारी राऊत यांनी यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश काढले आहे. त्यानुसार एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती या प्रकरणाची चौकशी करेल, अशी माहिती सिव्हिल सर्जन नीळकंठ भोसीकर यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : वडिलांचे हात-पाय बांधले अन् नराधमाने आईवरच केला बलात्कार

    follow whatsapp

    ADVERTISEMENT