Hyderabad : श्रद्धासारखेच हत्याकांड! दगड फोडायच्या मशीनने केले तुकडे अन् फ्रीजमध्ये ठेवले

मुंबई तक

ADVERTISEMENT

hyderabad Crime News : man cut the dead body of live in partner into many pieces
hyderabad Crime News : man cut the dead body of live in partner into many pieces
social share
google news

man killed live in partner in hyderabad like shraddha walkar murder : श्रद्धा वालकर हत्याकांडासारखीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. हैदराबादमध्ये एका व्यक्तीने लिव्ह इन पार्टनरची चाकूने हत्या केली. त्यानंतर आरोपीने क्रौर्याचा कळसच गाठला. लिव्ह इन पार्टनरच्या मृतदेहाचे दगड फोडायच्या मशीनने तुकडे केले आणि फ्रीजमध्ये लपवून ठेवले. बऱ्याच दिवसानंतर त्याने महिलेचं शीर कचऱ्यात फेकलं आणि त्याने केलेल्या क्रूर कृत्याचं बिंग फुटलं. (Horrible! man killed live in partner in hyderabad)

दिल्लीतील प्रसिद्ध श्रद्धा खून प्रकरणासारखे प्रकरण हैदराबादमध्ये समोर आले आहे. एका व्यक्तीने प्रेयसीची चाकूने भोसकून हत्या केली. यानंतर दोन दगड कापण्याच्या मशीन खरेदी केल्या. त्याने महिलेच्या मृतदेहाचे तुकडे केले, डोके छाटले आणि पॉलिथिनमध्ये ठेवले. हे सगळे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले. काही दिवसांनी त्याने शिर कचराकुंड्याजवळ फेकून दिला. त्यानंतर कोणताही पुरावा राहू नये म्हणून त्याने घर साफ केले. एवढेच नाही तर तो मृत महिलेच्या फोनवरून तिच्या ओळखीच्या लोकांना मेसेजही पाठवत होता, जेणेकरून लोकांना ती जिवंत आहे असे वाटावे.

प्रकरण काय?

17 मे रोजी सुधाकर नावाच्या कर्मचाऱ्याला थियागलगुडा रोडवरील कचऱ्यात काळ्या रंगाच्या पॉलिथिनमध्ये महिलेचं शिर सापडलं. यानंतर त्याने याची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी चौकशी केली आणि मृत महिलेचं नाव येरम अनुराधा रेड्डी असे असल्याचं समोर आलं. मयत अनुराधा 55 वर्षांच्या होत्या. मयत महिलेचे 48 वर्षीय चंद्र मोहनसोबत 15 वर्षांपासून अवैध संबंध होते. त्यांना पतीने खूप आधी सोडलेलं होतं. त्यामुळे ती चंद्रमोहनच्या घरी राहत होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

man killed his girlfriend by stabbing her
हैदराबादमध्ये एका व्यक्तीने लिव्ह इन पार्टनरची चाकूने हत्या केली.

चंद्रमोहनने अनुराधाला का मारले?

अनुराधा व्याजावर पैसे द्यायची असे तपासात निष्पन्न झाले आहे. चंद्र मोहनने 2018 मध्ये अनुराधाकडून 7.00 लाख रुपये घेतले होते. अनुराधा चंद्रमोहनला पैसे परत करण्यास सांगत होती, पण चंद्रमोहन पैसे परत करत नव्हता. पैसे परत करण्याचा अनुराधाने चंद्रमोहनकडे तगादा लावला, तसेच सतत दबावही टाकत होती. यावरून दोघांमध्ये भांडण व्हायचे.

man killed his Live in partner in hyderabad
लिव्ह इन पार्टनरच्या मृतदेहाचे दगड फोडायच्या मशीनने तुकडे केले आणि फ्रीजमध्ये लपवून ठेवले.

 

ADVERTISEMENT

यातून सुटका करून घेण्यासाठी चंद्रमोहनने एक कट रचला. 12 मे रोजी चंद्रमोहन आणि अनुराधा यांच्यात पैशावरून पुन्हा भांडण झाले. यादरम्यान चंद्रमोहनने अनुराधावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Nagpur : मायलेकराचा भयंकर शेवट! मुलाने संपवलं आयुष्य, आईनेही घेतलं विष

हत्येनंतर मृतदेह लपविण्याची योजना आखली

अनुराधाची हत्या केल्यानंतर चंद्रमोहनने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. त्याने आधी दगड कापण्याचे दोन यंत्रे खरेदी केली. या मशीनने तिचं शिर कापलं. नंतर मृतदेहाचे अनेक तुकडे केले. हे तुकडे काळ्या रंगाच्या पॉलिथिनमध्ये ठेवले. त्यानंतर कापलेले हात पाय पॉलिथिनमध्ये ठेवून फ्रीजमध्ये लपवून ठेवले. तर बाकीचे धड सुटकेसमध्ये ठेवले होते.

man killed live in partner in hyderabad like shraddha walkar murder
बऱ्याच दिवसानंतर त्याने महिलेचं शीर कचऱ्यात फेकलं आणि त्याने केलेल्या क्रूर कृत्याचं बिंग फुटलं.

 

15 मे रोजी चंद्रमोहन एका ऑटोमध्ये आला आणि डम्पिंग ग्राऊंडमध्ये कापलेले डोके फेकून पळून गेला. यानंतर आरोपीने फिनाइल, डेटॉल, परफ्युम, अगरबत्ती, कापूर आणि परफ्युम स्प्रेच्या बाटल्या विकत घेतल्या आणि त्या अनुराधाच्या मृतदेहाच्या तुकड्यांना लावत राहिला, जेणेकरून दुर्गंधी पसरू नये. इतकेच नाही तर आरोपी अनुराधाच्या फोनवरून तिच्या ओळखीच्या लोकांना मेसेज पाठवत होता, जेणेकरून लोकांना तिचा मृत्यू झाला आहे, हे कळू नये.

श्रद्धा वालकरची अशीच झाली होती हत्या

यापूर्वी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. श्रद्धाचा प्रियकर आफताब याने तिची दिल्लीतील मेहरौली येथे हत्या केल्याचा आरोप आहे. आफताबने गेल्या वर्षी 18 मे रोजी श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे करण्यात केले होते.

हेही वाचा >> Rape Case: 17 वर्षाच्या वासनांध मुलीचा 2 अल्पवयीन मुलांवर बलात्कार, मुलीची आईही…

मृतदेह ठेवण्यासाठी आफताबने फ्रीज विकत घेतला होता. यामध्ये त्याने मृतदेहाचे तुकडे ठेवले होते. तो रोज रात्री श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात असे. इतकंच नाही तर श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहत होता, इतकेच नाही तर त्याच्या इतर मैत्रिणीही त्याला भेटायला या फ्लॅटमध्ये येत होत्या.

आफताबला पोलिसांनी 12 नोव्हेंबरला अटक केली होती. पॉलिग्राफी टेस्ट आणि नार्कोमध्येही आफताबने श्रद्धाचा खून केल्याची कबुली दिलेली आहे. एवढेच नाही तर श्रद्धाच्या मृत्यूनंतर त्याचे अनेक मुलींशी संबंध असल्याचेही आफताबने कबूल केले होते. याशिवाय, पोलिसांनी मेहरौलीच्या जंगलातून श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडेही जप्त केले होते. डीएनए चाचणीतही श्रद्धाच्या वडिलांच्या नमुन्याशी मृतदेहाचे तुकडे जुळले. श्रद्धा हत्येप्रकरणी पोलिसांनी नुकतेच आफताबविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT