मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याबद्दल अश्लील पोस्ट करणारा निघाला विद्यार्थी, पोलिसांनी कसा शोधला ठिकाणा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अश्लील शिवीगाळ करण्याऱ्या एकाला मुंबई सायबर पोलिसांनी मोठ्या शिताफिने पकडले आहे. महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधिक्षक संजय शिंत्रे यांनी याबाबत माहिती दिली आहे. हा व्यक्ती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह, महिला खासदार, महिला पत्रकार यांच्याबद्दल अश्लील शिवीगाळ भाषेचा वापर करुन अपमानास्पद, लज्जास्पद, आपत्तीजनक मजकूर पोस्ट करत होता. तशी तक्रार सायबर पोलिसांकडे देण्यात आली होती.

मुंबई सायबर पोलीस अधिक्षक संजय शिंत्रे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, १४ ऑक्टोबर, 2022  रोजी फिर्यादीने एका Twitter Handle वरुन एक व्यक्ती अश्लील शिवीगाळ भाषेचा वापर करत आहे. अपमानास्पद, लज्जास्पद, आपत्तीजनक मजकूर  संविधानिकपदावर असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला खासदार, महिला पत्रकार यांच्याविरोधात प्रसारित करीत असल्याबाबतची फिर्याद महाराष्ट्र सायबरकडे प्राप्त झाली होती.

आरोपीने शोध लागू नये म्हणून शक्कल लढवली होती

तक्रार प्राप्त होताच सायबर पोलिसांनी सदरील व्याक्तीचा शोध सुरु केला. आरोपी इसमांनं पोलिसांना शोध लागू नये यासाठी Public Wifi, Hotspot, VPN चा वापर करुन सदरचा मजकूर प्रसारित केला होता. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करुन तांत्रिक पुराव्याच्या आधारे अहमदनगर जिल्ह्यातील राहूरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, येथे २८ ऑक्टोबर रोजी धाड टाकली. यादरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेऊन दि २९ ऑक्टोबर रोजी मुंबईत आणण्यात आलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यामागे कोण? पोलीस करत आहेत तपास

संशयितांना मुंबईला आणून सखोल तपास केला. तपासाअंती गणेश नारायण गोटे, २९ वर्षे यांस अटक करण्यात आली आहे. तपासात दोन मोबाईल फोन, एक लॅपटॉप जप्त करण्यात आले असुन त्याचे तांत्रिक विश्लेषण करुन संशियताने प्रसारित केलेला मजकूर आणखी कोणाकडून तयार करुन घेतला आहे का याबाबत तपास सुरु आहे, असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

न्यायालयाने सुनावली 02 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

पोलिसांनी सदर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने सदर आरोपीस  02 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. अधिक तपास महाराष्ट्र सायबरचे पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले हे करीत आहेत. सध्या सोशल मिडीयाचा गैरवापर बऱ्याचप्रमाणात सुरु आहे. फेक अकाऊंट बनवूण एखाद्याला ट्रोल करण्याचा प्रकार सर्रास सुरु आहे. वरिष्ठ पदावर असलेल्या व्याक्तींवर देखील अभद्र टिपण्णी केली जात आहे. अशाप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT