१० लाखांच्या चॉकलेट्सवर दुकानातल्या नोकरानेच मारला डल्ला, अंबाजोगाईतला धक्कादायक प्रकार

वाचा सविस्तर बातमी, एकाला अटक, दुसरा नोकर फरार
Beed Crime News Theft Of Chocolate wort rupees 10 Lakh by a Shop Worker Police Arrested one
Beed Crime News Theft Of Chocolate wort rupees 10 Lakh by a Shop Worker Police Arrested one

आजपर्यंत आपण नगदी रक्कम, सोन्या चांदीची चोरी होत असल्याचे ऐकले आहे. मात्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे चक्क चॉकलेटची चोरी झाल्याची घटना उघडकीस आलीय. तेही तब्बल दहा लाखाची याप्रकरणी दोन चोरट्यांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोडाऊनची डुप्लिकेट चावी तयार करून चॉकलेटच्या एजन्सी मधील दोन नोकरांनी मागील दीड वर्षात सुमारे दहा लाख रुपयांच्या चॉकलेटची चोरी करून विक्री केल्याची घटना बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई शहरात उघडकीस आली आहे.

अंबाजोगाई येथील व्यावसयिक प्रदीप उमाकांत वाघमारे ( रा . रविवार पेठ ) यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्याकडे चॉकलेटची डिस्ट्रीब्यूटरशिप आहे . सदरील एजन्सीवर गणेश सखाराम मुनीमाने ( रा . चनई ) आणि राहुल वैजीनाथ पवार ( रा . प्रशांत नगर ) हे दोन नोकर मागील पाच वर्षापासून कामाला आहेत. सर्वकाही व्यवस्थित सुरु असताना वाघमारे यांना मागील दोन महिन्यापासून त्यांचा व्यवसाय तोट्यात असल्याचे जाणवू लागले. त्यामुळे विचारात पडलेल्या वाघमारे यांना मालाची चोरी होत असल्याची शंका आली.

वाघमारे यांनी गोडाऊनसमोर कॅमेरे बसवले होते. कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता त्यात गणेश मुनीमाने आणि राहुल पवार हे दोघे चॉकलेटचे बॉक्स चोरी करताना मिळुन आले . त्यामुळे वाघमारे यांनी पाळत ठेऊन शनिवारी (दि.०५) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास दोन्ही नोकरांना चॉकलेटचे बॉक्स चोरताना रंगेहाथ पकडले . यावेळी राहुल पवार पळून जाण्यात यशस्वी झाला तर गणेश मुनीमाने यास पकडून चौकशी केली असता त्याने मागील दीड वर्षापासून दोघे मिळून चोरी करत असून आतापर्यंत दहा लाखांचा माल चोरून विकल्याचे सांगितले. सदरील आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर दि.8 नोव्हेंबरला हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान नोकरांनीच चॉकलेटची चोरी केल्याने चर्चा होत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in