19 वर्षीय तरुणीने बनवले भावा-बहिणीचे अश्लील फोटो; कारण…
Cyber Crime : एका महिला आणि तिच्या भावाला बदनाम करण्यासाठी एका 19 वर्षीय तरुणीने एक विचित्र गोष्ट केली. ज्यामुळे आता तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे.
ADVERTISEMENT

Cyber Crime News: एका महिला (Lady) आणि तिच्या भावाच्या (Brother) फोटोसोबत छेडछाड करून ते फोटो (obscene photos) सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी एका 19 वर्षीय तरुणीला दिल्ली पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. पोलिसांनी मंगळवारी याबाबतची ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, तरुणीला महिलेच्या भावाचा बदला घ्यायचा होता. कारण तरुणीचा असा आरोप आहे की, महिलेच्या भावाने तिची प्रतिमा खराब केली होती. (cyber crime 19 year old girl was defaming brother and sister by making obscene photos)
दरम्यान, या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘तक्रारदार महिलेने असा आरोप केला आहे की, कोणी तरी तिच्या फोटोशी छेडछाड करून ते अश्लील फोटो हे सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.’
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी सांगितले की, तरुणीने महिलेला आणि तिच्या भावाला त्रास देण्यासाठी आणि बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर तिच्या भावाच्या मोबाइल नंबरसह अपमानजनक संदेश प्रसारित केले. त्याचवेळी त्यांच्या नातेवाइकांना देखील अश्लील मेसेजह पाठवले.
अधिक वाचा- ज्या मुलीच्या हत्येप्रकरणी पिता-पुत्र गेले तुरुंगात, ती आली परत; मग सापडलेला मृतदेह कुणाचा?
पोलीस उपायुक्त (उत्तर) सागर सिंग कलसी म्हणाले, ‘तपासादरम्यान पोलिसांना आढळून आले की, गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाइल क्रमांक 19 वर्षीय मुलीच्या आईच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्यानंतर उत्तर पश्चिम दिल्लीतील इंद्रलोक भागात राहणाऱ्या मुलीला शनिवारी पकडण्यात आले.