भयंकर.. अर्धनग्न अवस्थेत आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; चेहरा जाळून ओळख मिटविण्याचा प्रयत्न

Gondia Crime: गोंदियामध्ये एका अल्पवयीन तरुणीची हत्या करुन तिचा चेहरा जाळून टाकल्याची भीषण घटना उघडकीस आली आहे.
भयंकर.. अर्धनग्न अवस्थेत आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; चेहरा जाळून ओळख मिटविण्याचा प्रयत्न
gondia crime body of a minor girl was found half naked Trying to erase identity by burning face

व्यंकटेश दुडमवार, गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याअंतर्गत कुंभारटोलीलगत जंगल परिसर आहे. या परिसरात एका पंधरा ते सोळा वयोगटातील तरुणीचा आज (21 एप्रिल) सकाळी मृतदेह आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीचा चेहरा जाळून तिची ओळख मिटविण्याचा प्रयत्न मारेकऱ्याकडून करण्यात आला आहे..

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचा मृतदेह जंगल परिसरात फेकून देण्यात आला होता. आज सकाळी कुंभारटोली गावातील काही लोक जंगल परिसरात सरपण वेचण्यासाठी गेले होते. यावेळी काही गावकऱ्यांना युवतीचा मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती आमगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आमगावच्या ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, ही हत्या नेमकी का आणि कुणी केली असावी याचा आता पोलीस शोध घेत आहेत. तसेच हत्या नेमकी कशी केली याबाबत शवविच्छेदनानंतरच नेमकी माहिती कळू शकते. ज्यानंतर गुन्ह्याचा तपास कोणत्या दिशेने करायचा हे पोलीस ठरवतील.

ही घटना काल रात्री घडली असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त. पोलिसांनी याप्रकरणी अशी शक्यता व्यक्त केली आहे की, काही अज्ञात इसमांनी या तरुणीवर अत्याचार केला असावा आणि त्यानंतर तिची हत्या केली असाी. तसेच तिची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा जाळण्यात आला असावा. हा प्राथमिक अंदाज असला तरी आरोपींना अटक झाल्याशिवाय या प्रकरणाचा नेमका खुलासा होणार नाही. यासाठीच आता आमगाव पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

या घटनेचा तपास करण्यासाठी श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आलं आहे. यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस गोंदियावरून आले आहेत. आरोपींनी तिची हत्या केल्यानंतर तिचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला. काल रात्रीच ही धक्कादायक घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही तरुणी कुठली आहे. तिची हत्या का करण्यात आली, हे सर्व प्रश्न सध्यातरी निर्माण झाले आहेत. आमगाव पोलीस याचा तपास करत आहे. कुठल्या पोलीस ठाण्यात तरूणीची मिसिंग तक्रार आहे का, याची देखील माहिती मागविली जात आहे.

कॉलेजमागे आढळला मुंडकं छाटलेला, नग्नावस्थेतील तरुणीचा मृतदेह!

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चंद्रपूरमध्ये एका शेतात एका तरुणीचं मुंडकं छाटलेला मृतदेह सापडला होता.. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीचा मृतदेह हा पूर्णपणे विविस्त्र अवस्थेत होता. याशिवाय तरुणीचं मुंडकं देखील पूर्णपणे छाटून गायब करण्यात आलं होतं. सुरुवातीला या तरुणीची ओळख पटविण्यात अनेक अडचणी येत होत्या. अखेर पोलिसांनी वैद्यकीय टीमच्या मदतीने या तरुणीची आधी ओळख पटवली आणि नंतर या निर्घृण हत्येचा छडा देखील लावला. यासाठी पोलिसांच्या तब्बल 9 टीम काम करत होत्या.

या प्रकरणात तरुणीच्या सोबत राहणाऱ्या तिच्या एका मैत्रिणीनेच तिची हत्या केल्याचं समोर आलं होतं. आपल्या एका मित्राच्या मदतीने ही हत्या करण्यात आली होती. ज्या तरुणीची हत्या करण्यात आली होती ती तरुणी आरोपी मैत्रिणीचा सातत्याने अपमान करायची. याच रागातून तिने तरुणीची हत्या केली.

gondia crime body of a minor girl was found half naked Trying to erase identity by burning face
Crime: इंजिनिअर मुलाने आई-वडिलांसमोर केली पत्नीची हत्या, मुंडकं कापून फेकलं नाल्यात तर धड टाकून दिलं जंगलात

हत्येनंतर तरुणीची ओळख पटू नये यासाठी तिच्या अंगावरील सर्व कपडे आणि वस्तू काढून घेतल्या आणि त्यानंतर तिचं मुंडकं देखील छाटून टाकलं आणि ते आपल्यासोबत नेऊन अज्ञातस्थळी टाकून दिलं. अद्यापही पोलिसांना तरुणीचं मुंडकं सापडू शकलेलं नाही. या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी अतिशय शिताफिने तपास करुन आरोपी मैत्रिणीला काही दिवसांच्या आतच अटक केली.

Related Stories

No stories found.