हत्येपूर्वी अशरफने नाव घेतलेल्या गुड्डू मुस्लिमला नाशिकमधून अटक, सत्य काय? - Mumbai Tak - guddu muslim arrest claims atique murder asad encounter umesh pal - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

हत्येपूर्वी अशरफने नाव घेतलेल्या गुड्डू मुस्लिमला नाशिकमधून अटक, सत्य काय?

एका प्रश्नाला उत्तर देताना ‘मुख्य गोष्ट ही आहे की, गुड्डू मुस्लिम…’, हे एवढेच शब्द अशरफ बोलला आणि त्यानंतर हल्लेखोरांपैकी एकाने अतिक आणि अशरफच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडली.
Guddu Muslim was arrested in Nashik? Wha fact, read detailst is fact, read details

नाशिक : उमेश पाल (Umesh Pal) खून प्रकरणातील आरोपी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची प्रयागराजमध्ये 15 एप्रिलला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात नेले जात असताना पोलीस बंदोबस्तात घुसून हल्लेखोरांनी गोळीबार केला. अंदाधुंद गोळीबारामुळे पोलिसांमध्येही एकच गोंधळ उडाला. अनेक गोळ्या लागल्याने अतिक आणि अशरफ हे जागीच मृत्यूमुखी पडले. (Guddu Muslim was arrested in Nashik? Wha fact, read detailst is fact, read details)

यावेळी पोलीस बंदोबस्तामध्ये माध्यमांशी बोलताना अतिकचा भाऊ अशरफ प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी पुढे आला. एका प्रश्नाला उत्तर देताना ‘मुख्य गोष्ट ही आहे की, गुड्डू मुस्लिम…’, हे एवढेच शब्द अशरफ बोलला आणि त्यानंतर हल्लेखोरांपैकी एकाने अतिक आणि अशरफच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडली. एवढेच नाही तर त्याच्या अन्य दोन साथीदारांनी दोघांनाही लक्ष्य करून अनेक राऊंड फायर केले.

Atiq Ahamad : सनी, लवलेश आणि अरुण; तिघांनी अतिक-अशरफची का केली हत्या?

या हत्येनंतर गुड्डू मुस्लिम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसं तर 24 फेब्रुवारीपासूनच उमेश पाल यांच्या हत्येप्रकरणी पोलीस गुड्डू मुस्लिमचा शोध घेत आहेत. उमेश पाल हत्येप्रकरणी गुड्डू मुस्लिमवर बॉम्ब फेकल्याचा आरोप आहे. अशात आता अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर गुड्डू मुस्लिम पुन्हा एकदा चर्चेत आला.

गुड्डू मुस्लिमला नाशिकमधून अटक?

दरम्यान, सोशल मिडीयावर अतिक आणि अशरफच्या हत्येच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 एप्रिलला अनेकांनी गुड्डू मुस्लिमला महाराष्ट्रातील नाशिक अटक केल्याचा दावा केला आहे. मात्र, हे वृत्त खोटं असल्याचं समोर आलं आहे. ‘आज तक’चे प्रतिनिधी दीपेश त्रिपाठी यांच्या वृत्तानुसार, नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुड्डू मुस्लिमच्या अटकेचा साफ इन्कार केला आहे.

अंकुश शिंदे यांनी सांगितलं की, दिल्ली पोलिसांचं एक पथक वेलकम हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरची शस्त्रास्त्रांशी संबंधित एका प्रकरणात चौकशी करण्यासाठी आलं होतं. रात्री उशिरा चौकशी करून त्यांनी वेटरला सोडलं. एका गुंडाच्या मोबाईलवर या वेटरचा कॉल आला होता. वेटरनं सांगितलं की त्याने मिस्ड कॉल नंबरवर पुन्हा कॉल केला, त्यानंतर समोरच्या व्यक्तीने चुकून नंबर डायल केल्याचं सांगितलं. या चौकशीनंतर वेटरला सोडून देण्यात आलं. ही व्यक्ती गुड्डू मुस्लिम नव्हती. तसंच यूपी एसटीएफच्या कोणत्याही टीमने आतापर्यंत आमच्याशी संपर्क साधलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

‘मेन बात ये है कि गुड्डू मुस्लिम…’ अतिकचे शेवटचे शब्द अन् थेट डोक्यात गोळी…

यापूर्वी 13 एप्रिल रोजी अतिकचा मुलगा असद आणि त्याचा सहकारी गुलाम यांच्या मृत्यूच्या दिवशीही गुड्डू मुस्लिमला पोलिसांनी घेरल्याच्या बातम्या आल्या होत्या. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने गुड्डू मुस्लीमला घेरलं, असे दावे करण्यात आले. मात्र, उत्तरप्रदेशचे विशेष पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पत्रकार परिषदेत अशा प्रकारच्या अफवांचं खंडन केलं. प्रशांत कुमार यांनी असे कोणतेही अपडेट नसल्याचे सांगितलं होतं.

गुड्डूवर 5 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. उमेश पाल हत्याकांडात गुड्डू सीसीटीव्ही फुटेजमध्ये बॉम्ब फेकताना दिसला होता. गुड्डू हा जुना रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याचे उत्तर प्रदेशातील सर्व माफियांशी संबंध असल्याचे सांगितले जाते. तसंच तो गोळी मारत नाही, तर तो बॉम्बफेक करून मारतो, असं सांगितलं जातं.लखनौच्या नाका भागात बॉम्बस्फोट करून एकाच्या हत्येप्रकरणी त्याला तुरुंगातही पाठवण्यात आले होते.

झोप येत नसेल तर हे करुन बघा, 60 सेकंदात झोप येईल लग्न नकोच! ‘या’ मराठी अभिनेत्री घटस्फोटानंतर सिंगल लाइफ करतायेत एन्जॉय Amitabh love story : पुण्यात बघितलं अन् पहिल्या नजरेतच खेळ खल्लास! ODI 2023: न्यूझीलंडला मोठा झटका, ओपनिंग सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर! iPhone 15 Pro ला 40 हजारात खरेदी करण्याची संधी! फक्त हे करा… Rinku Rajguru : हर हर महादेव! आर्ची थेट पोहोचली केदारनाथ दर्शनाला ‘Animal’ साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस! पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली ‘ही’ मागणी जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी…