Crime : बहिणीसोबत होते संबंध, कंडोमच्या पाकिटाने कसं सोडवलं हत्येचे गूढ?
ही घटना आहे उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यातील. 11 जून रोजी आंबेडकर नगर जिल्ह्यातील बेवना पोलीस स्टेशन अंतर्गत भित्रीडीह गावातील शाळेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.
ADVERTISEMENT

UP Crime News: पोलिसांना शाळेजवळ एक मृतदेह सापडला. मृतदेह जळलेल्या अवस्थेत होता. आणि आजूबाजूला काहीही नव्हतं. त्याचवेळी पोलिसांची नजर पडली कंडोमच्या पाकिटावर. याच कंडोमच्या पाकिटाने हत्या करणाऱ्या आरोपीपर्यंत पोलिसांना पोहोचवलं. यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी फक्त कंडोमचं पाकिट पुरावा म्हणून मिळाल्यानंतर केलेला तपास उल्लेखनीय आहे.
ही घटना आहे उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यातील. 11 जून रोजी आंबेडकर नगर जिल्ह्यातील बेवना पोलीस स्टेशन अंतर्गत भित्रीडीह गावातील शाळेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह जळालेल्या अवस्थेत होता. मृतांची ओळख पटवणे अत्यंत कठीण झाले होते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले. पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या जागेची पाहणी केली. त्यावेळी त्यांना कंडोमचे पाकीट सापडले.
घटनास्थळावरून फक्त कंडोमच्या पाकिटाशिवाय काहीच न सापडल्याने हे प्रकरण पोलिसांसमोर आव्हान बनून उभे राहिले. त्यांना काहीच सुगावा लागत नव्हता. मृताची ओळख पटू शकत नव्हती आणि इतर कोणतेही पुरावे सापडत नव्हते.
ब्रँडचे कंडोम कुठे मिळते?
आता पोलिसांकडे पुरावा म्हणून फक्त कंडोमचे पाकीट होते. तपासात असे आढळून आले की या ब्रँडचे कंडोम दिल्ली एनसीआरमध्ये उपलब्ध असतात. यासोबतच पश्चिम यूपीमध्येही या ब्रँडचे कंडोम उपलब्ध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.










