पुणे हादरलं, बायको, मुलाची हत्या केली अन् IT इंजिनिअरने…

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

PUNE IT engineer Case: पुणे: पुण्याच्या (Pune) औंध परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 44 वर्षीय IT इंजिनिअर (IT engineer) असलेल्या एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि 8 वर्षाच्या मुलाची हत्या (Wife and son Murder) करून आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला आहे. ज्यानंतर पुण्यात एकच खळबळ माजली. (it engineer in pune killed his wife and son and committed suicide)

मिळालेल्या माहितीनुसार, औंध परिसरात राहणाऱ्या सुदिप्तो गांगुली आणि त्यांचं कुटुंब हरवल्याची तक्रार पुणे पोलिसांना मिळाली होती. याच तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा त्यांनाही हादरवून टाकणारी माहिती समोर आली.

पुण्याचे उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितलं की, औंध परिसररातील तिघे जण हरविल्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री दाखल झाली. ही तक्रार मयत सुदिप्तो गांगुली यांच्या मित्राने बंगलोरहून दाखल केली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तक्रारीनुसार सुदिप्तो गांगुली (वय 44 वर्ष) त्याची पत्नी प्रियांका गांगुली (वय 40 वर्ष) आणि मुलगा तनिष्क गांगुली (वय 8 वर्ष) हे हरवले आहेत असा निष्कर्ष त्यांच्या मित्रांनी काढला होता. कारण दोन दिवसांपासून सुदिप्तो, त्याची पत्नी आणि मुलगा यापैकी कोणीच फोन उचलत नव्हतं. त्यामुळेच मित्राने पुणे पोलिसांशी संपर्क साधून याप्रकरणी तक्रार दाखल केली.

ज्यानंतर पोलिसांनी पुण्यातील औंध परिसरात नताशा हौसिंग सोसायटीमध्ये दिलेल्या पत्यावर जाऊन तपासाला सुरुवात केली. यावेळी पोलिसांना सुदिप्तो यांच्या घरात तीन जणांचे मृतदेह आढळून आले. पत्नी आणि मुलाची हत्या केल्यावर सुदीप्तो यांनी स्वतः आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. मात्र, सुदिप्तोने हे टोकाचं पाऊल का उचललं यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

ADVERTISEMENT

पुण्यात निवृत्त कर्नलने गोळी झाडून केली पत्नीची हत्या, स्वत:लाही संपवलं

ADVERTISEMENT

सुदिप्तो गांगुली हा मंगळवारी रात्री फोन उचलत नव्हता. त्यामुळे बंगळुरू येथे राहणाऱ्या त्याच्या भावाने मित्रांकरवी शोधा-शोध सुरू केली. अखेर मंगळवारी रात्री त्यांनी सुदिप्तो आणि त्याची पत्नी व मुलगा हरविल्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दिली. ज्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आली.

पुण्यात 85 वर्षांच्या वडिलांची चाकूचे वार आणि डोक्यात वरंवटा घालून हत्या, मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे हे शहर गेल्या काही काळात अधिकच कॉस्मोपॉलिटिन होत चाललं आहे. IT हब अशी ओळख झालेल्या पुण्यात आता देशभरातून तरुण, तरुणी हे नोकरीसाठी येत आहेत. आयटीमधील गलेलठ्ठ पगार यामुळे तरूणांना पुणे आकर्षित करू लागलं आहे. मात्र, यासोबत अनेक समस्यांना देखील आमंत्रण दिलं जात आहे. ज्या समस्या आता आयटी तरूणांसाठी जीवघेण्या ठरू लागल्या आहेत. ज्याची उदाहरणं गेल्या काही वर्षात आपल्या सातत्याने पाहायला मिळत आहे.

सुदिप्तो गांगुली यांच्यासारखं अनेक आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी टोकाची पावलं उचलल्याची उदाहरणं आपल्यासमोर आहे. अशावेळी आता वाढता ताण आणि समस्या याबाबत प्रशासनाने वेळीच योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे. अन्यथा अशा घटनांमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जे समाजासाठी प्रचंड घातक ठरू शकतं.

पुण्यात अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली हत्या

    follow whatsapp

    ADVERTISEMENT