Udaipur Killing: हिंदू टेलरची हत्या करणारे पाकिस्तानातील अतिरेकी संघटनेशी जोडलेले?
राजस्थानच्या उदयपूरमध्ये मंगळवारी दोघांनी कन्हैया लाल नावाच्या टेलरची हत्या केली. या क्रुर हत्येमुळे राजस्थानमधिल जातीय तणाव वाढला आहे. शांतता राखण्यासाठी एक महिन्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. मोहम्मद रियाझ आणि घौस मोहम्मद असे दोन गुन्हेगार, इस्लामच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आले होते. पिडीत टेलरने भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. प्रेषित मुहम्मह पैगंबर […]
ADVERTISEMENT

राजस्थानच्या उदयपूरमध्ये मंगळवारी दोघांनी कन्हैया लाल नावाच्या टेलरची हत्या केली. या क्रुर हत्येमुळे राजस्थानमधिल जातीय तणाव वाढला आहे. शांतता राखण्यासाठी एक महिन्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. मोहम्मद रियाझ आणि घौस मोहम्मद असे दोन गुन्हेगार, इस्लामच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आले होते. पिडीत टेलरने भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. प्रेषित मुहम्मह पैगंबर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिपण्णी केल्यामुळे शर्मांना पक्षातून निलंबीत केले होते.
गुन्ह्याची कबुली देणारे व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींचा पाकिस्तानमधील दावत-ए-इस्लामी या धार्मिक चळवळीशी संबंध असल्याचे तपासकर्त्यांचे म्हणणे आहे. दावत-ए-इस्लामी ही सुन्नी मुस्लीम संघटना आहे. ही संघटना प्रेषित पैगंबरांच्या विचारांचा प्रचार करते तसेच इस्लामचा आनलाईन धडे देते. त्याचबरोबर एक टीव्ही चॅनेल देखील चालवते.
दावत-ए-इस्लामीची स्थापना मौलाना इलियास अत्तारी याने 1981 मध्ये कराची येथे केली होती. तेव्हापासून, ती जगभरातील सुमारे 194 देशांमध्ये पसरली आहे. संघटनेच्या संस्थापकाच्या नावामुळे, संस्थेशी संबंधित असलेले लोक त्यांच्या नावांच्या समोर “अटारी” असे जोडतात.
दावत-ए-इस्लामी भारतात कशी आली?










