Pune: भर दिवसा पुणे हादरलं... आंदेकर टोळीचा ‘मुळशी पॅटर्न’, 'त्या' रिक्षा चालकाला एका मिनिटात संपवलं कारण...

मुंबई तक

Pune Crime News: वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याची आज (1 नोव्हेंबर) अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

ganesh kale brother of sameer kale accused in vanraj andekar murder case shot dead on a busy road in pune
पुणे हत्या प्रकरण
social share
google news

आदित्य भवर, पुणे: कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज (1 नोव्हेंबर) चित्रपट‘मुळशी पॅटर्न’ची आठवण करून देणारी थरारक घटना घडली आहे. रिक्षाचालक असलेल्या गणेश काळे (वय अंदाजे 30 वर्ष) याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सहा राऊंड फायर करत थेट कोयत्याने वार केले. या भयानक हल्ल्यात गणेश काळे जागीच ठार झाला.

पुण्यात भर रस्त्यात नेमकं काय घडलं?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत गणेश काळे हा कुख्यात गुन्हेगार समीर काळे याचा भाऊ असून तो येवलेवाडीत वास्तव्यास होता. समीर काळे हा सध्या कारागृहात असून तो सोमा गायकवाड टोळीचा सदस्य असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश काळेवर हल्लेखोरांनी सलग सहा गोळ्या झाडल्या. त्यानंतर खात्री करण्यासाठी त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे ही वाचा>> Pune: आयुष कोमकरच्या शरीरात सापडल्या 9 गोळ्या, मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आजोबानेच नातवाला संपवलं? चक्रावून टाकणारी स्टोरी!

पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की, गणेशचा भाऊ समीर काळे हा वनराज आंदेकर खून प्रकरणात सहभागी होता. त्यानेच त्या वेळी खुनासाठी लागणारी पिस्तुले मध्य प्रदेशातून आणली होती. त्या वेळी समीरसह आबा खोंड, आकाश म्हस्के आणि संगम वाघमारे या चौघांनी मिळून 9 पिस्तुले धुळे मार्गे मध्यप्रदेशातून आणल्याची माहिती तपासात समोर आली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp