राज ठाकरेंनी दाखवला सर्वात मोठा पुरावा, उडवून दिली खळबळ... म्हणाले, 'मुरबाडमध्ये राहणाऱ्यांनी...'
मतदार याद्यांमध्ये लाखो दुबार मतदार असल्याचा दावा करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतील विरोधकांच्या मोर्चा काही पुरावे सादर केले. पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यातील मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करण्यासाठी आज (1 नोव्हेंबर) विरोधकांनी मुंबई भव्य असा मोर्चा काढला. दोन्ही ठाकरे बंधू आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक दिग्गज नेते हे 'सत्याचा मोर्चा' यामध्ये सहभागी झाले होते. दक्षिण मुंबईतील फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय इथवर हा मोर्चा काढण्यात आला होता. ज्यानंतर इथे प्रमुख नेत्यांची भाषणं पार पडली. यावेळी सुरुवातीलाच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मतदार याद्यांमधील दुबार मतदारांची थेट नाव घेत एकच खळबळ उडवून दिली.
कल्याण, डोंबिवली, मुरबाडमधील मतदारांनी थेट मलबार हिल मतदारसंघात दुबार मतदान केल्याचं सांगत राज ठाकरेंनी थेट दुबार मतदारांच्या लाखो याद्याच जनतेसमोर आणल्या आहेत.
राज ठाकरेंनी थेट दाखवले पुरावे, उडवून दिली खळबळ
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'आजचा मोर्चा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा, दिल्लीपर्यंत समजण्याचा, समजवून सांगण्याचा मोर्चा आहे. या विषयावर अनेकांनी अनेकदा बोललेले आहेत.'
'खरं तर छोटा विषय आहे हा, फार मोठा विषय नाही. आम्ही बोलतो आहोत, उद्धव ठाकरे बोलतायेत, पवार साहेब बोलतायेत की, यामध्ये दुबार मतदार आहेत. सगळेचं जणं बोलतायेत.. एवढंच नव्हे तर भाजपचे लोकं पण बोलतायेत की, दुबार मतदार आहेत. शिंदेंची लोकं बोलतायेत, अजित पवारांची लोकं बोलतायेत दुबार मतदार आहेत. अरे मग अडवलंय कोणी.. मग ही निवडणूक घेण्याची घाई का करतात?'














