अवघ्या 500 रूपयांसाठी शेजाऱ्यानेच घेतला जीव, संपूर्ण गावं हादरलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

500 Rupees man beaten her neighbour : पैशाच्या देवाण-घेवाणीचे (Money Transaction) व्यवहार अनेकदा मारहाणीपर्यंत पोहोचतात. हीच मारहाण कधी कधी जीवावरही बेतते. अशीच एक जीवावर बेतणारी आणि माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेत 500 रूपयांसाठी (500 loaned) एका शेजाऱ्यानेच शेजाऱ्याचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपुर्ण गावं हादरलं आहे. तसेच परीसरात शोककळा पसरली आहे.(man beaten to death by neighbour for failed to return 500 rupees loan west bengal news)

500 रूपये दिले उधार

40 वर्षाच्या बनमाली प्रामाणिकने त्याचा शेजारी प्रफुल्ला रॉयकडून 500 रूपये उधारीवर (500 loaned) घेतले होते. दोघांच्या व्यवहाराला अनेक दिवस उलटले होते.मात्र बनमाली हे पैसे परत करू शकला नव्हता. त्यामुळे दोघांमध्ये या पैशावरून खटके उडायचे. तसेच या मुद्यावर अनेकदा वादही झाला. हा वाद होऊन सुद्धा बनमाली उधारीवरचे 500 रूपये परत करू शकला नव्हता. बामंगोला पोलिस स्टेशन हद्दीतील गंगाप्रसाद कॉलनीत ही घटना घडली होती.

रिक्षात अश्लील चाळे; प्रेमी युगुलाला हटकलं, प्रियकराने टाकला रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड अन्…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाद टोकाला पोहोचला

500 रूपयावरून (500 loaned) सतत खटके उडक असतानाच, पुढे जाऊन हा वाद खुपच टोकाला पोहोचला. रविवारी पुन्हा एकदा प्रफुल्ला रॉयने बनमाली प्रामाणिककडे उधारीच्या 500 रूपये परत करण्याची मागणी केली. माझ्याजवळ आता पैसै नाही आहेत, पण लवकरच तुझे पैसे परत करेन, असे उत्तर बनमालीने दिले होते. बनमालीच्या या उत्तराला प्रफुल्ला खुपच वैतागला होता.

उधारीवरून जीवघेणा हल्ला

रविवारी बनमाली चायच्या टपरीवर बसला होता, त्यावेळेस मागून येऊन प्रफुल्लाने त्यांच्या डोक्यावर बांबूने हल्ला केला. या हल्ल्यात बनमालीच्या डोक्यात मोठी इजा झाली. त्याअवस्थेत तो घरी पोहोचला होता. त्यावेळेस त्याला उलट्या देखील झाल्या. स्थानिकांनी त्याला रूग्णालयात दाखल केले होते. यावेळी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Crime : नवऱ्याला सोडून दिरासोबत थाटला संसार; रेल्वे स्टेशनवर सापडाला मृतदेह

ADVERTISEMENT

जखमी अवस्थेत बनमाली घरी पोहोचताच आम्ही त्याला रूग्णालयात घेऊन गेलो. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले अशी माहिती बनमालीचा भाऊ अजयने दिली. या प्रकरणी बरमालीच्या कुटूंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर प्रफुल्लाला अटक करण्यात आली आहे. बनमालीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

पश्चिम बंगालच्या बामंगोला पोलिस (Police) स्टेशन हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेवर नागरीकांकडून संताप व्यक्त होतोय.तसेच परीसरात शोककळा पसरली आहे. या घटनेने माणूसकीला काळीमा फासली गेली आहे.

Crime : लाखात पगार, घरी सुरळीत…; तरीही उच्चशिक्षित तरुणानं संपवलं आयुष्य

    follow whatsapp

    ADVERTISEMENT