Pubg Murder Case: प्रॉपर्टी डीलर माझ्या आईला भेटायला यायचा- आरोपी; बहिणीने सांगितला घटनाक्रम
लखनौ: लखनौ PUBG खून प्रकरण दिवसेंदिवस नवे वळण घेत आहे. १६ वर्षीय मुलाने आपल्या आईने PUBG खेळण्यापासून रोखल्याने तिची हत्या केली होती. मुलाची बालसुधार गृहात चौकशी चालू असताना त्याने नवीन खुलासे केले आहेत. संशयाची सुई वडीलांकडे जात असतानाच आणखी एक नाव समोर आले आहे. मुलाच्या म्हणण्यानुसार, एक प्रॉपर्टी डीलर आईला भेटण्यासाठी घरी वारंवार येत असे, […]
ADVERTISEMENT

लखनौ: लखनौ PUBG खून प्रकरण दिवसेंदिवस नवे वळण घेत आहे. १६ वर्षीय मुलाने आपल्या आईने PUBG खेळण्यापासून रोखल्याने तिची हत्या केली होती. मुलाची बालसुधार गृहात चौकशी चालू असताना त्याने नवीन खुलासे केले आहेत. संशयाची सुई वडीलांकडे जात असतानाच आणखी एक नाव समोर आले आहे. मुलाच्या म्हणण्यानुसार, एक प्रॉपर्टी डीलर आईला भेटण्यासाठी घरी वारंवार येत असे, ज्यामुळे तो चिडायचा. 4 जून रोजी वडिलांच्या बंदुकीने आरोपी मुलाने आपल्या आईवरती गोळ्या झाडल्या, त्यानंतर त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आले होते.
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर?
चौकशीदरम्यान, आरोपी मुलाने खुलासा केला की एक प्रॉपर्टी डीलर काका त्याच्या आईला भेटण्यासाठी वारंवार घरी येत असे. तो अनेकदा वडिलांच्या अनुपस्थितीतही त्यांच्या घरी येत असे, ज्यामुळे आरोपीला त्याचा खूप राग यायचा.
मुलाने चौकशीदरम्यान उघड केले की एके दिवशी त्याने आपल्या वडिलांकडे याबद्दल तक्रार केली, त्यानंतर त्याचे वडील आणि आई यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यानंतर त्याच्या आईने त्याला मारहाण केली. तो म्हणाला, त्याची आईही अनेक दिवस घरापासूनही दूर राहायची.