मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष थिगळेंवर गोळीबार! छातीवर बंदूक ठेवली पण,…

मुंबई तक

पुणे जिल्ह्यात धक्कादायक आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना घडलीये. पुणे शहरात एकीकडे कोयता गँगचा हैदोस सुरू असताना आता मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. नशीब बलवत्तर म्हणून थिगळे या घटनेत थोडक्यात बचावले. पुणे मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर शनिवारी रात्री (21 जानेवारी) गोळीबार करण्यात आला. राजगुरूनगरच्या सातकरस्थळ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

पुणे जिल्ह्यात धक्कादायक आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना घडलीये. पुणे शहरात एकीकडे कोयता गँगचा हैदोस सुरू असताना आता मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. नशीब बलवत्तर म्हणून थिगळे या घटनेत थोडक्यात बचावले.

पुणे मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर शनिवारी रात्री (21 जानेवारी) गोळीबार करण्यात आला. राजगुरूनगरच्या सातकरस्थळ येथील त्यांच्या राहत्या घरासमोरच हा धक्कादायक प्रकार घडला.

Pune Crime : बंदुकीचा धाक अन् महिलेला खाऊ घातली स्मशानातील हाडांची पावडर

“मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय. तुलाही माज आलाय. संपवतोच तुला”, असं म्हणत पिस्तुल रोखुन एकाने पैशाची मागणी करत समीर थिगळे यांना धमकी दिली.

हे वाचलं का?