डोक्यात दगड टाकून 28 वर्षीय तरुणाची हत्या, मोबाइलवर बोलण्याच्या वादातून मित्राला संपवलं
मिथिलेश गुप्ता, बदलापूर: एका 28 वर्षीय तरुणाची निर्जनस्थळ असलेल्या मोकळ्या जागेत डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बदलापुरात उघडकीस आली होती. ही हत्या देखील अत्यंत क्षुल्लक कारणावरुन झाल्याचं आता समोर आलं आहे. मोबाइलवरून जास्त वेळ बोलण्याच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड टाकून हत्या केल्याचे धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, बदलापूर: एका 28 वर्षीय तरुणाची निर्जनस्थळ असलेल्या मोकळ्या जागेत डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बदलापुरात उघडकीस आली होती. ही हत्या देखील अत्यंत क्षुल्लक कारणावरुन झाल्याचं आता समोर आलं आहे.
मोबाइलवरून जास्त वेळ बोलण्याच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड टाकून हत्या केल्याचे धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. समसूल हक गुलाम करीम असे अटक केलेल्या आरोपी मित्राचे नाव आहे. तर प्रसाद जिंजुरके असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मृतक प्रसाद हा बदलापूर पूर्वेकडील सापेगाव परिसरात असलेल्या पोतदार सोसायटीत आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याच सोसायटीमध्ये आरोपी समसूलही पत्नी व आपल्या दोन मुलासह राहतो. त्यामुळे दोघांची बऱ्याच वर्षांपासून मैत्री होती. तसंच दोघं मिळून पेंटरचं काम देखील करत होते.
आरोपी मित्राच्या मोबाइलवरून मृत प्रसाद बराच वेळ बोलत होता. त्यावेळेस आरोपीने त्याला माझ्या मोबाइलवरून जास्त बोलू नकोस म्हणून वाद घातला. झालेल्या वादाचा राग समसूलच्या मनात एवढा होता की, त्याने थेट प्रसादचा कायमचा काटा काढण्याचं ठरवलं.