4 तरूणांकडून 14 वर्षांच्या मुलीवर पाशवी अत्याचार, हादरून गेलेल्या मुलीनं जीवनच संपवलं!

मुंबई तक

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि हा प्रकार सहन न झाल्याने पीडित मुलीने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार...
14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार...
google news

बातम्या हायलाइट

point

14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

point

सहन न झाल्याने मुलीने केली आत्महत्या

Gang Rape Crime: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि हा प्रकार सहन न झाल्याने पीडित मुलीने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. खुर्जा नगरमधील एका परिसरात ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पीडितेच्या घरी पीडित मुलीचा मृतदेह सापडला. खुर्जा नगर पोलीस पथकाने मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.  


 

पोलिसांनी दिली माहिती  

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जून रोजी पीडितेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेसंदर्भात पीडितेच्या नातेवाईकांनी 2 जुलै रोजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या या घटनेचा तपास केला असता त्यांनी प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली.


 

बाईक राईडच्या बाहण्याने अन्...  

 

हे वाचलं का?