यूट्यूबर तरुणीने आपल्या आईलाच केली बेदम मारहाण! नंतर, घरच्यांनी सांगितली चकित करणारी कहाणी...
17 वर्षीय वंशिकावर तिच्या आईनेच गंभीर आरोप केल्याचे सांगितलं जात आहे. घर बळकावण्यासाठी वंशिकाने आपल्या आई-वडिलांना शिवीगाळ करत त्यांना बेदम मारहाण केल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
यूट्यूबर तरुणीने आपल्या आईलाच केली बेदम मारहाण!
नंतर, घरच्यांनी सांगितली चकित करणारी कहाणी...
Crime News: उत्तर प्रदेशातील हापुडमध्ये राहणारी वंशिका नावाची सुप्रसिद्ध युट्यूबर सध्या चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. 17 वर्षीय वंशिकावर तिच्या आईनेच गंभीर आरोप केल्याचे सांगितलं जात आहे. घर बळकावण्यासाठी वंशिकाने आपल्या आई-वडिलांना शिवीगाळ करत त्यांना बेदम मारहाण केल्याचं वृत्त आहे. वंशिका आपल्या आईला शिवीगाळ करत तिला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यासंबंधी पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करणारी वंशिकाची आई बंटी देवी ही आदर्श कॉलनीमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. तिने आपली 17 वर्षीय मुलगी वंशिका आणि तिच्या यूट्यूब चॅनलचे मॅनेजर हिमांशु यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
घर आणि प्लॉट नावावर करण्याची योजना
महिलेच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिची मुलगी 'वंशिका हापुड वीके' नावाने एक युट्यूब चॅनेल चालवते. मागील 2 वर्षांपासून ती तिच्या चॅनल मॅनेजर हिमांशुसोबत राहत आहे. आईच्या आरोपीनुसार, हिमांशूने वंशिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. वंशिकाची आई म्हणाली की, हिमांशूची अशी इच्छा आहे की वंशिकाने तिच्या घरातील सर्व दागिने आणि पैसे चोरून त्याला द्यावेत आणि घर तसेच प्लॉट त्याच्या (हिमांशूच्या) नावावर करावा.
हे ही वाचा: राजकीय पक्षाच्या नेत्यावर महिलेसोबत घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप! थेट रॉडने प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला अन्...
आरोपींनी दिली धमकी...
एफआयआरनुसार, 4 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी, वंशिका तिचा मॅनेजर हिमांशू आणि त्याचा भाऊ यशसोबत आईच्या घरी गेली आणि घरात घुसताच वंशिका तिच्या आईला शिवीगाळ करत म्हणाली, "हे घर माझे आहे." वंशिकाच्या बोलण्याला तिच्या आईने विरोध खेला असता वंशिकाने तिला मारहाण केली आणि हिमांशु, यशला सुद्धा घरात बोलवलं. त्यानंतर, तिघांनी मिळून आई आणि बहीण शिखाला बेदम मारहाण केली.










