Pushpa चित्रपटातील अभिनेत्याला अटक, अभिनेत्रीसोबत नको ते केलं अन्…

ADVERTISEMENT

Actress Pushpa film actor Jagdish Bandarila stuck in suicide
Actress Pushpa film actor Jagdish Bandarila stuck in suicide
social share
google news

Suicide News: ज्या पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्या चित्रपटातील एका अभिनेत्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, जगदीश बंदरीला एका महिलेच्या आत्महत्येप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.  एका महिला कलाकाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या ठेवण्यात आला आहे. तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याला हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती देताना त्यांनी सांगितले की, जगदीश पी. बंदारी याला एका 34 वर्षीय महिलेचा आणि एका पुरुषाचा फोटो काढून तिला धमकवण्याचा प्रयत्न केला होता.

धमकी आणि ब्लॅकमेल

जगदीश बंदरी याच्यावर फोटो काढण्याबरोबरच धमकी देणे आणि ब्लॅकमेल करण्यासारखे त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जगदीशने ब्लॉकबस्टर फिल्म पुष्पामध्ये कामही केले होते. पोलिसांनी सांगितले की, जगदीशने महिलेला धमकी आणि ब्लॅकमेल केल्यानंतर आत्महत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता त्याच्यावर गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

अभिनेत्रीच्या वडिलांनी केली तक्रार

तपासाअंती पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आणखी काही त्याने त्रास दिला आहे का त्याचाही तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी महिलेच्या वडिलांनी पंजागुट्टा पोलिसात तक्रार दाखल केली होती. जगदीशने पुष्पा चित्रपटात काम केले असल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

धमकावल्याचे कारण धक्कादायक

महिलेला त्याने का धमकावले आहे. तो तिला किती दिवसांपासून महिलेला त्रास देत होता त्याचाही तपास पोलीस करत आहे. तसेच महिलेला धमकवण्यात त्याच्याबरोबर आणखी कोणाचा त्यात हात आहे का त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT