वहिनीसोबत संबंध… मुलांना दिल्या झोपेच्या गोळ्या अन् पत्नीसोबत केलं भयंकर कृत्ये
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) झांसीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पतीचे (Husband) वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधाची माहिती बायकोला मिळताच पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद व्हायचे. या वादातून आता पतीने बायकोचा काटा काढल्याचा घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) झांसीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पतीचे (Husband) वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधाची माहिती बायकोला मिळताच पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद व्हायचे. या वादातून आता पतीने बायकोचा काटा काढल्याचा घटना घडली आहे. आरोपी पतीने चिकन बनवून त्यात औषध मिसळून बायकोला बेशुद्ध केले होते. यानंतर तिची निघृण हत्या केली आहे. या घटनेने राज्य हादरलं आहे. (Affaire with brothers wife husband kills his wife jhansi crime news)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनूसार, झासीच्या प्रेमनगर ठाणे हद्दीत संजीव रायकवार यांचे कुटुंब राहते. संजीव यांच्या पत्नीचे नाव रेखा रायकवार असून या दोघांना 5 मुले आहेत. संजीव आणि रेखा यांचा एख सुखी संसार सुरु होता. या संसारात आता संजीव यांच्या वहिनीची एन्ट्री झाली होती.त्यामुळेच आता संजीव आणि रेखा यांच्यात वाद होऊ लागले आहेत. संजीव यांचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते.या अनैतिक संबंधांची माहिती संजीव यांच्या पत्नी म्हणजेच रेखा रायकवार यांना मिळाली होती. त्यामुळे रेखा यांनी संजीव आणि त्यांच्या वहिनी यांच्यातील अनैतिक नात्यांना विरोध करायला सुरुवात केली होती. या विरोधातूनच दररोज संजीव आणि रेखामध्ये भांडणे व्हायची.
हे ही वाचा : Crime News : बेडरुमध्ये सुनेला बघून संतापलेल्या सासूने गोळीच घातली, कारण…
असा रचला कट
रेखाच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनूसार, शनिवारी संजीव घरी आला आणि त्याने चिकन बनवले होते. घरातले जेवण बनवून झाल्यावर संजीव थेट आपल्या वहिनीला भेटायला तिच्या घरी निघाला होता. याबाबची माहिती रेखा यांना मिळताच त्यांनी तत्काळ वहिनीच्या घरी धाव घेऊन वाद घालायला सुरुवात केली. या घटनेमुळे वहिनीच्याच घरी पती-पत्नीचे जोरदार भांडणे झाली. या भांडणानंतर दोघेही घरी परतले आणि तिथेही भांडू लागले होते. यानंतर रागातून रेखा आपल्या खोलीत निघून गेली होती. या दरम्यान संजीवने किचनमध्ये जाऊन चिकनमध्ये औषध मिसळलं होतं. हे चिकन रेखाने नंतर खाल्यानंतर ती जागीच बेशुद्ध झाली होती. या बेशुद्धाअवस्थेचा फायदा उचलून संजीवने चाकूने वार करून तिची हत्या केली. या हत्येनंतर संजीव घटनास्थळावरून फरार झाला आहे.
हे वाचलं का?
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी रेखा यांना झांसीच्या मेडिकल कॉलेजमधील रूग्णालयात दाखल केले होते. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. स्थानिकांनी पोलिसांना देखील या घटनेची माहिती दिली होती. यानुसार पोलिसांनी रेखाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ताब्यात घेतला होता. तसेच या प्रकरणी तक्रार दाखल करून आरोपी पती संजीवचा शोध घेतला जात आहे.
रेखाचा भाऊ धर्मेद्र याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजीवने जेवणात औषध मिसळून रेखाला खायला घातल होते. जेव्हा रेखा बेशुद्ध झाली, तेव्हा आरोपीने तिची चाकूने हत्या केली. मृतांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीचे वहिनीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती देखील एसपी ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सासऱ्याने सुनेचं मुंडकंच केलं धडावेगळं, क्रूर हत्येमागचं कारण काय?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT