Akanksha Dubey : ‘त्या’ रात्री हॉटेलमध्ये कोणी सोडलं? आत्महत्येपूर्वीचं CCTV फुटेज आलं समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

CCTV footage has come to the fore in the case of Bhojpuri actress Akanksha Dubey's death
CCTV footage has come to the fore in the case of Bhojpuri actress Akanksha Dubey's death
social share
google news

Bhojpuri Actress Akanksha Dubey Suicide :

ADVERTISEMENT

भोजपुरी चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) हिच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणाने आता नाट्यमय वळण घेतलं आहे. या प्रकरणी पोलिसांना भोजपुरी गायक समर सिंह यांच्यावर संशय असून त्याचा शोधासाठी आझमगड तसेच मुंबई-पाटणा येथे छापेमारी सुरू आहे. पोलिसांनी समर सिंहविरोधात लुकआउट नोटीसही जारी केली आहे. समर सिंह परदेशात पळून गेला असावा असा पोलिसांना संशय आहे. अशातच या प्रकरणात एक सीसीटीव्ह फुटेज समोर आलं आहे. यामुळे या प्रकरणात आणखी काही नवीन उलगडा होणार का? असा सवाल विचारला जात आहे. (the video of the person with whom Akanksha Dubey came to the hotel has also surfaced from the CCTV camera)

काय आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये?

ज्या हॉटेलमध्ये आकांक्षा दुबेचा मृतदेह सापडल होता, त्याच सोमेंद्र रेसिडेन्सी हॉटेलमधील हे Exclusive सीसीटीव्ही फुटेज आहे. रात्री 2 च्या दरम्यानचे, हे सीसीटीव्ही फुटेज असून यावेळी आकांक्षा दुबेसोबत एक तरुणही दिसून येत आहे. याच तरुणासोबत आकांक्षा गाडीतून हॉटेलमध्ये आली आणि तो तिला हॉटेलच्या रूममध्ये घेऊन गेला. इतकचं नाही हॉटेलच्या रूममध्येही दोघांनी काही वेळही घालवला. त्यानंतर त्यानंतर तो तरुण आपल्या कारमध्ये निघून गेला. ‘संदीप सिंह’ असं या व्यक्तीचे नाव आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आकांक्षा दुबेचे कुटुंबीय वारंवार प्रश्न उपस्थित करत आहेत की पोलिसांनी त्या संदीप सिंगला कसे सोडले?

हे वाचलं का?

हेही वाचा : मृत्यूपूर्वी आकांक्षा पार्टीत खुश होती; नंतर असं काय झालं की तिने आत्महत्या केली?

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की संदीप सिंह आणि आकांक्षा दुबे रविवारी रात्री उशिरा (मध्यरात्री 1:50 च्या सुमारास) एका काळ्या एसयूव्ही गाडीतून हॉटेलच्या गेटवर आले. निळी जीन्स आणि ब्लॅक टॉप घातलेली आकांक्षा दुबे आणि संदीप सिंग हॉटेलमध्ये गेले. रिसेप्शनमधून दोघेही 105 क्रमांकाच्या खोलीच्या गॅलरीमध्ये आले. यावेळी आकांक्षा तिच्या बॅगेतील चाव्या शोधत असल्याचं आणि चावी मिळाल्यावर रुममध्ये जात असल्याचं दिसून येतं.

ADVERTISEMENT

आकांक्षाच्या पाठीमागे संदीप सिंहही रुममध्ये जातो. काही वेळ सोबत घालवल्यानंतर संदीप सिंह खोलीतून बाहेर आला आणि कारमधून निघून गेला. त्यानंतर 2:30 वाजता आकांक्षा दुबे इंस्टाग्रामवर लाईव्ह झाली, याच Live मध्ये ती रडताना दिसत आहे. यानंतर सकाळी बराच वेळ आकांक्षा खोलीतून बाहेर न आल्याने पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांच्या उपस्थितीत सकाळी 10.30 वाजता रुम उघडली असता आकांक्षाचा मृतदेह पंख्याच्या साहाय्याने दुपट्ट्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Akanksha Dubey: आकांक्षा शुटिंगसाठी वाराणसीला आली, नंतर हॉटेलमध्ये सापडला लटकलेला मृतदेह

दरम्यान, आकांक्षा दुबेच्या आई, वडील आणि इतर नातेवाईकांनी वाराणसीच्या सारनाथ पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी पोलिस प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही केली. आकांक्षाची आई म्हणाली- “समर आणि संजयने तिच्या मुलीची हत्या केली आहे. योगी सरकारने माझ्या मुलीला न्याय द्यावा अशी माझी मागणी आहे. समर सिंग आणि संजय सिंग यांना फाशी द्यावी. ती आत्महत्या करू शकत नाही. संजय आणि समर यांनी मिळून त्याची हत्या केली आहे. याआधीही ती सांगायची की समर तिला खूप छळायचा”. तर आकांक्षा दुबेचे वडील म्हणाले, “आकांक्षा ही त्यांची मुलगी नसून ती त्यांचा मुलगा आहे. ती कुटुंब चालवत असे. समर सिंह केवळ आकांक्षावर त्याच्यासोबत काम करण्यासाठी दबाव टाकत असे”, असा आरोप केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT