भाचीच्या डोहाळे जेवणासाठी आलेल्या मावशीचे 11 लाखांचे दागिणे लंपास, पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

मुंबई तक

Pune crime news : पुणे शहरात एका महिलेच्या एक दोन नाहीतर तब्बल ११ लाखांच्या दागिण्यांची चोरी करण्यात आली. ही घटना पुणे शहरातील शिवणे येथे घडली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ADVERTISEMENT

भाचीच्या बेबी शॉवरमध्ये मावशीचे 11 लाखांचे दागिणे लंपास
भाचीच्या बेबी शॉवरमध्ये मावशीचे 11 लाखांचे दागिणे लंपास
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात गुन्हेगारी आणि चोरीच्या प्रमाणात अधिक वाढ होताना दिसून येत आहे.

point

राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यातील महिलेचे 11 लाखांचे सोने चोरीला गेले.

Pune crime news : पुण्यात गुन्हेगारी आणि चोरीच्या प्रमाणात अधिक वाढ होताना दिसून येत आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरात एक दोन नाहीतर तब्बल 11 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुणे शहरातील शिवणे परिसरात 20 एप्रिल 2025 रोजी घडली आहे. याविरोधात उत्तमनगर पोलीस ठाण्यात पीडित महिलेनं तक्रार दाखल केली आहे. पीडित महिला ही आपल्या भाचीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी आली असता हा प्रकार घडला. 
 
पुणे शहरातील शिवणे परिसरात डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान एका महिलेच्या बॅगमधून तब्बल 10 लाख 80 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. या प्रकरणात पोलीस सूत्रांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

हेही वाचा : MBBS चे 3 विद्यार्थी सोबतच नदीत बुडून दगावले... चंद्रपूरमध्ये घडलेली घटना नेमकी काय?

तक्रारदार महिला ही मुंबईतील ताडदेव परिसरातील रहिवाशी आहे. ती महिला आपल्या भाचीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला गेली होती. हा कार्यक्रम शिवणे परिसरातील आर्यक रेसिडेन्सीतील एका हॉलमध्ये सुरू होता. त्या कार्यक्रमादरम्यान चोरी केल्याचं सांगण्यात येत आहे.  

या कार्यक्रमानंतर चोरीविषयीची माहिती समोर आली. जेव्हा ती महिला तिच्या बहिणीच्या घरी परतली असताच तिच्या बॅगेतून दागिने लंपास केले असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संबंधित प्रकरणाचा तपास केला. चोरीचं प्रकरण उलगडण्यासाठी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. 

हेही वाचा : "पाकिस्तानच्या मातीत दहशतवादाला...", ट्रम्प यांच्या हस्तक्षेपावरून संतप्त ओवैसींचे 4 सवाल

कार्यक्रम पार पडल्यानंतर, महिला मुंबईला गेली असता त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षण अमृता चवरे तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp