मित्राच्या बायकोवर जडला जीव, मित्राला दारु पाजली अन् केला मर्डर; धक्कादायक प्रकरण
एका महिलेने तिचा पती तिला मारहाण करतो अशी तक्रार पतीच्या मित्राकडे केली आणि पतीला समजावून सांगण्यास विनंती केली. मात्र त्या मित्राच्या डोक्यात वेगळंच काहीतरी चालू होतं. अखेर या घटनेचा भयानक शेवट झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मित्राच्या बायकोवर जडला जीव
मित्राला दारु पाजली अन् केला मर्डर
धक्कादायक प्रकरण
Crime News : एका पत्नीने आपल्या पतीच्या त्रासाबद्दल पतीच्याच मित्राकडे मन मोकळे केले, मात्र हा संवाद तिच्या संसारासाठी काळ ठरेल अशी पुसटशी कल्पनाही तिला नव्हती. बेंगलोरमधील आर.के. टाऊनशिप लेआउटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 42 वर्षीय बांधकाम मजूर सुनील नायक याची त्याच्याच मित्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली आणि त्याचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पोत्यात भरून माळरानावर फेकून दिला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपीने सुनीलच्या पत्नीला मिळवण्यासाठी हे भयानक पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
रक्ताने माखलेला मृतदेह आढळला
25 मार्चच्या रात्री सुनील नायक घरी परतला नाही, तेव्हा त्याची पत्नी पुष्पा हिने घरमालक आनंद यांना माहिती दिली. शोधाशोध सुरू असताना 26 मार्चच्या सकाळी एका रिकाम्या भूखंडावर पोलिसांना एक संशयास्पद गोणी सापडली. ती उघडली असता त्यात सुनीलचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सुनीलचा मित्र वासुदेव मलिक (30) याला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत समोर आले की, घटनेच्या रात्री सुनील आणि वासुदेव एकत्र दारू पित बसले होते. वासुदेव हा मूळचा ओडिशाचा असून त्याची आणि सुनीलची जुनी ओळख होती.
हे ही वाचा : तरुण महिलांची वाळवत टाकलेली अंतर्वस्त्रे चोरायचा, तेच वस्त्र परिधान करून कॅमेऱ्यासमोर अश्लील...
मित्राच्या बायकोवर जडला जीव
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील हा दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून पत्नी पुष्पाला मारहाण आणि त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून पुष्पाने भावनिक आधारासाठी वासुदेवला आपली कैफियत सांगितली होती. मात्र, पुष्पाचे दुःख ऐकून वासुदेवचा तिच्यावर जीव जडला. तिला कायमचे आपले करण्यासाठी त्याने सुनीलचा काटा काढण्याचे ठरवले. दारूच्या नशेत असताना वासुदेवने चाकूने सुनीलचा गळा चिरला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरला. मात्र, आसपासच्या लोकांच्या वावरामुळे घाबरलेल्या आरोपीने मृतदेह तिथेच टाकून पळ काढला.
हे ही वाचा : 5 वर्षांच्या चिमुरड्यावर शाळेत सामूहिक बलात्कार अन् हत्या, शाळेच्या संचालकावर कुटुंबियांचा खळबळजनक आरोप
चुकीच्या व्यक्तीकडे व्यक्त केले दु:ख
इलेक्ट्रॉनिक्स सिटीचे पोलीस उपायुक्त एम. नारायण यांनी स्पष्ट केले की, या हत्येमध्ये पत्नी पुष्पाचा कोणताही सहभाग नाही; तिने केवळ आपली घरगुती अडचण मित्राला सांगितली होती. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी वासुदेव मलिक याला अटक केली आहे. हत्येसाठी वापरलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. एका चुकीच्या व्यक्तीकडे व्यक्त केलेले दुःख एका कुटुंबाचा अंत ठरल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









